वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत दिनांक २१ जुन रोजी जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले हे होते तर प्राचार्य डॉ सय्यद ईस्माइल, प्राचार्य डॉ उदय खोडके, प्राचार्य डॉ गिरिधर वाघमारे, प्राचार्या डॉ जया बंगाळे, सहयोगी अधिष्ठाता (निम्न शिक्षण) डॉ गजेंद्र लोंढ, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ सचिन मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात डॉ धर्मराज गोखले म्हणाले की, आज संपुर्ण जगात योग दिन साजरा करण्यात येत आहे. नियमित योगाचा सराव केल्याने जीवनातील ताणतणाव कमी होण्यास मदत होते. व्यक्ती अधिक कार्यक्षमतेने कार्य करू शकतो. योग व आसन हे आपल्या जीवनशैलीचा भाग झाला पाहिजे असे ते म्हणाले.
याप्रसंगी ऑर्ट ऑफ लिविंगचे योगशिक्षक प्रा. दिवाकर जोशी, डॉ सुब्बाराव, शरद डोलारकर, सुनिल बोरवते, महेश दशरते, गजानन कोरळवार, देवश्री हमदापुरकर, अर्चना घनवट आदींच्या मार्गदर्शनानुसार विविध आसने, प्राणायाम आदींचे सामुदायिकरित्या प्रात्यक्षिके करण्यात आली.
कार्यक्रमात योगशिक्षण शरद डोलारकर यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात डॉ सचिन मोरे यांनी यावर्षीच्या जागतिक योग दिनाचे घोष वाक्य मानवतेसाठी योग असल्याचे सांगितले. सुत्रसंचालन डॉ आशाताई देशमुख यांनी केले. कार्यक्रमात विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आदींनी मोठया संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रम यशस्वीतेकरिता विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयातील डॉ डी एफ राठोड, डॉ चव्हाण आदीसह कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.