वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाच्या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत मौजे इंदेवाडी येथे पशुंना घटसर्प आणि फऱ्या रोग प्रतिबंधक लसीकरण मोहीम दिनांक २५ रोजी राबविण्यात आली. कार्यक्रमास पशुधन विकास अधिकारी डॉ. आडे, डॉ. अमोल कच्छवे, डॉ. रतन कच्छवे, सरपंच संदीप कच्छवे, रतन कच्छवे, संजय सिसोदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात डॉ आडे, डॉ अमोल कच्छवे आणि डॉ रतन कच्छवे यांनी लसीकरण व जनावरांचे पावसाळात घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी कृषीदुतांनी पशुपालकांना भिंतीफलकावर व तक्त्याद्वारे जनावरांच्या रोगांविषयी माहिती दिली. सदरिल कार्यक्रम शिक्षण संचालक डॉ. डी. एन. गोखले, प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल, रावे समन्वयक डॉ राजेश कदम, कार्यक्रम अधिकारी डॉ एस आर जक्कावाड यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रावेच्या कृषिदुतांनी परिश्रम घेतले.