Tuesday, December 3, 2013

‘गृह विज्ञान आपल्‍या दारी, कुटूंबाचे कल्‍याण करी’ अभिनव योजनेद्वारे गृहविज्ञानाचा प्रसार

मार्गदर्शन करतांना सहयोगी अधिष्‍ठाता प्रा. विशाला पटनम
मार्गदर्शन करतांना डॉ. विजया नलावडे

मार्गदर्शन करतांना डॉ. सुनिता काळे 

      वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत असलेल्‍या गृह विज्ञान महाविद्यालयातर्फे गृह विज्ञान आपल्‍या दारी, कुटूंबाचे कल्‍याण करी या अभियानांतर्गत दुस-या फेरीमध्‍ये दि 30 नोव्‍हेबर रोजी हिंगोली जिल्‍ह्यातील मौजे करंजाळा, बाराशिव व जवळाबाजार येथे कार्यक्रम घेण्‍यात आले. सहयोगी अधिष्‍ठाता प्रा. विशाला पटनम यांनी शालेय विद्यार्थ्‍यांना पंच ज्ञानेद्रियांच्‍या वापरातुन उच्‍च शालेय संपादणुक, कौटुबिक आनंदी जीवनाची गुरुकिल्‍लीमाता बाल मृत्‍युदर कमी करण्‍यासाठी कुटुंबाची जबाबदारी या विषयावर महिलांना मार्गदर्शन केले. तर बाराशिव येथील निवासी शाळात प्रा. विजया नलवडे यांनी गृह विज्ञानाचे शिक्षण, उत्‍तम पोषण उत्‍तम आरोग्‍य हीच खरी कुटुंबाची दौलत आणि आहार कसा असावा याविषयी विद्यार्थींनींना माहिती दिली. जवळाबाजार येथे डॉ. सुनिता काळे यांनी कौटुंबिक उत्पन्‍नास लावण्‍या हातभार गृहिणींनो करा लघु उद्योगाचा स्‍वीकार या विषयावर गृहीणीशी संवाद साधला.

      कार्यक्रमाच्‍या शेवटी तज्ञांनी केलेल्‍या मार्गदर्शनावर आधारित प्रश्‍न मंजुषा घेवून अचुक उत्‍तरे देणा-या लाभार्थ्‍यांना उत्‍कृष्‍ट श्रोता पुरस्‍कार देण्‍यात आले. या निवडक गावांमध्‍ये कार्यक्रमाचे आयोजन संशोधन सहयोगी रेश्‍मा शेख, ज्‍योत्‍स्‍ना नेर्लेकर, मंजुषा रेवणवार, रुपाली पतंगे, अर्चना भोयर आणि शितल राठोड यांनी केले. तसेच गृह विज्ञान विषयक तंत्रज्ञानाचा प्रसार केला. या कार्यक्रमामध्‍ये गृह विज्ञान महाविद्यालय निर्मीत कुटुंबयोगी पुस्‍तकांचे प्रदर्शन व विक्री केली. कार्यक्रमांना महिला, विद्यार्थी तसेच ग्रामस्‍थ मोठया संख्‍येने उपस्थित होते. 

Monday, December 2, 2013

राष्‍ट्रीय सेवा योजनातर्फे जागतिक एड़स दिनानि‍मित्‍त सकस आहाराचे वाटप


वसंतराव नाईक मराठवाडा क़षि विदयापीठांतर्गंत कृषि अभियांत्रिकी महाविदयालयाच्‍या राष्‍ट्रीय सेवा योजनातर्फे जीवनरेखा बालसुधार गृहातील एड़सग्रस्‍त बालकांना सकस आहाराचे वाटप करण्‍यात आले. एड़सग्रस्‍त बालकांचे भविष्‍य उज्‍वल घडविण्‍याकरीता तसेच त्‍यांना समाजाच्‍या मुख्‍य प्रवाहात सामावून घेण्‍याकरीता सर्वस्‍तरातून जाणीव जाग़ृती घडवून एकत्रित प्रयत्‍नांची आवश्‍यकता असल्‍याचे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्‍यक्ष सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ उदय खोडके यांनी केले. प्रमुख पाहुणे डॉ. पवन चांडक व किर्तीकुमार बुरांडे यांनी रासेयोच्‍या या उपक्रमाबद़दल गौरवोद़गार काढले व अशा प्रकारे एड़सग्रस्‍त पिडीत बालकांसाठी वेगवेगळया माध्‍यमातून मदतीचा ओघ यावा अशी आशा त्‍यांनी व्‍यक्‍त केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रमाकांत कारेगावकर यांनी केले तर आभार प्रदर्शन कार्यक्रम अधिकारी प्रा. रवींद्र शिंदे यांनी केले. कार्यक्रमाच्‍या यशस्वितेकरीता स्‍वयंसेवक राहुल शेळके, कु. मयुरी काळे, कु. अश्विनी नितनवरे, कु. आकांक्षा कुलकर्णी, अमर‍दीप हत्‍तीअंबीरे, गौतम वाव्‍हळे आदीनी परिश्रम घेतले.   

Sunday, December 1, 2013

मला यशस्‍वी व्‍हायचंय हाच निश्‍चय तुम्‍हाला यशाकडे घेऊन जातो ...पोलीस अधिक्षक मा श्री संदिप पाटील

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ स्‍पर्धामंचाच्‍या वतीने संकल्‍प व्‍याख्‍यानमालेत पोलीस अधिक्षक मा श्री संदिप पाटील मार्गदर्शन करतांना, व्‍यासपीठावर विद्यापीठाचे कुलसचिव श्री का वि पागीरे, कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता डॉ डी बी देवसरकर, ज्‍वार संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ एच व्‍ही काळपांडे, मंचाचे अध्‍यक्ष अमोल राठोड, उपाध्‍यक्ष एस जी येवतीकर, विद्यार्थीनी अध्‍यक्ष कु स्‍वाती कदम, उपाध्‍यक्ष कु प्रियांका शिंदे आदी

अर्जुनाला जसा पक्षाचा फक्‍त डोळाच दिसत होता त्‍याप्रमाणे तुम्‍ही ध्‍येयाकडे पाहा, मला यशस्‍वी व्‍हायचयं हाच निश्चिय तुम्‍हाला यशाकडे घेऊन जाईल, असे प्रतिपादन पोलीस अधिक्षक मा श्री संदिप पाटील यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ स्‍पर्धामंचाच्‍या वतीने संकल्‍प व्‍याख्‍यानमालेत दि 01 डिसेंबर 2013 रोजी पोलीस अधिक्षक मा श्री संदिप पाटील यांचे राष्ट्रिय नागरी सेवा परीक्षेची तयारी यावर मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी व्‍यासपीठावर विद्यापीठाचे कुलसचिव श्री का वि पागीरे, कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता डॉ डी बी देवसरकर, ज्‍वार संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ एच व्‍ही काळपांडे, मंचाचे अध्‍यक्ष अमोल राठोड, उपाध्‍यक्ष शिवाजी येवतीकर, विद्यार्थीनी अध्‍यक्ष कु स्‍वाती कदम, उपाध्‍यक्ष कु प्रियांका शिंदे उपस्थित होते.
मा श्री संदिप पाटील पुढे म्‍हणाले कि, नागरी सेवेकडे अनेक विद्यार्थी आर्कषित होतात कारण नौकरीची शाश्‍वतता, समाजात मान व ओळख तसेच सर्वसामान्‍य विद्यार्थ्‍याना असामान्‍य होण्‍याची संधी आहे. यशाचे सुत्र सांगतांना ते म्‍हणाले कि, ध्‍येय स्पष्‍टता, ध्‍येयाप्रती प्रामाणिक प्रयत्‍न, गुणवत्‍ता वाढीस प्रयत्‍न, प्रयत्‍नात सातत्‍य, कामगिरी उंचावण्‍यासाठी प्रयत्‍न ही सहा तत्‍वे महत्‍वाची आहेत.

अभ्‍यास कसा करावा यासाठी त्‍यांनी पी क्‍यु आर एस टी (PQRST) हा मंत्र दिला, ते म्‍हणाले कि, पी म्‍हणजे प्रीव्‍हयु – पुर्ण विषयाचे पुर्वावलोकन करा, क्‍यु म्‍हणजे क्‍वेस्‍वनिंग – प्रश्‍नार्थक दृष्टिने विषयाकडे पाहा, आर म्‍हणजे रिडींग – प्रत्‍यक्ष विषयाचे वाचन, एस म्‍हणजे स‍मरी – सारांश काढणे व शेवटी टि म्‍हणजे टेस्‍टींग – चाचणी परिक्षा यापध्‍दतीने प्रत्‍येक विषयाचा अभ्‍यास केला तर निश्चितच चांगले गुण प्राप्‍त होऊ शकतात.

अभ्‍यासासाठी दिवसातुन किमान गुणात्‍मक 10 ते 12 तास दया, तसेच कमीत कमी अर्धा तास ताण कमी करण्यासाठी व्‍यायाम करा. मराठी विद्यार्थ्‍यांमध्‍ये गुणवत्‍ता आहे परंतु मनात एक न्‍युनगंड असतो. कृषि विद्यापीठात स्‍पर्धपरिक्षेसाठी पोषक वातावरण आहे, कृषि विद्यापीठाची गौरवशाली परंपरा आहे, या विद्यापीठाने अनेक प्रशासक राज्‍याला दिले आहेत, सकारात्‍मक दृष्टिकोन ठेऊन प्रयत्‍न करा शेवटी यश तुम्‍हचे आहे, असा प्रेरणादायी उदगार त्‍यांनी काढले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ स्‍पर्धामंच विद्यापीठातील विद्यार्थी व विद्यार्थीनी 2001 साली स्‍थापन केला असुन या मार्फत स्‍पर्धापरीक्षेच्‍या तयारीसाठी मार्गदर्शन वर्ग, वाचनालय, ग्रंथालय, चाचणी परिक्षा असे विविध उपक्रम राबविले जातात यासाठी विद्यापीठ मंचास मुलभुत सुविधा उपलब्‍ध करून देते.
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक मंचाचे अध्‍यक्ष श्री अमोल राठोड यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री दादासाहेब हाकाळे यांनी तर आभार प्रदर्शन सुनील भालेकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुजित सानप, नितीन लिंगायत, सतीश काकडे, अनिल खिलतकर, अरूण सिरसाट, ज्‍योती रामदिनलवार, पल्‍लवी पवार व मंचाच्‍या सदस्‍यांनी परीश्रम घेतले.
साधारणता 1000 विद्यार्थी व विद्यार्थीनी कृषि महाविद्यालयाच्‍या भरगच्‍च सभागृहात तब्‍बल सव्‍वादोन तास श्री संदिप पाटील यांनी मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थीशी थेट संवाद साधुन स्‍पर्ध परिक्षेबाबत शंकाचे समाधान केले.

Wednesday, November 27, 2013

‘गृह विज्ञान आपल्‍या दारी, कुटूंबाचे कल्‍याण करी’ अभिनव उपक्रमास ग्रामीण महिलांचा उत्‍स्‍फुर्त प्रतिसाद





वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या गृह विज्ञान महाविद्यालय, परभणी तर्फे मराठवाड्यातील विविध खेड्यातून ज्ञान प्रबोधनाचे कार्य करण्‍याच्‍या दृष्‍टीने गृह विज्ञान आपल्‍या दारी, कुटूंबाचे कल्‍याण करी अभिनव अभियानाचे उदघाटन नुकतेच आय. आय. टी. दिल्‍ली येथील आंतरराष्‍ट्रीय ख्‍यातीच्‍या प्राध्‍यापिका डॉ. रत्‍नमाला चटर्जी, शिक्षण संचालक डॉ. विश्‍वास शिंदे, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव श्री काशीनाथ पागिरे, गृह विज्ञान महाविद्यालयाच्‍या सहयोगी अधिष्‍ठाता प्रा. विशाला पटनम यांच्‍या उपस्थितीत पार पडला. अभियानामध्‍ये निवडक शंभर गावात वेगवेगळ्या चमुंद्वारे शनिवारी वेगवेगळ्या महत्‍वाच्‍या विषयांवर ग्रामस्‍थ व त्‍यांच्‍या कुटूंबियांना गृह विज्ञान ज्ञान विषयक माहिती देऊन त्‍यांच्‍या जीवनाचा दर्जा उंचावण्‍यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात येणार आहे. कार्यक्रमांतर्गत प्रभावीपणे मल्‍टीमीडीयाचा उपयोग करुन तसेच प्रात्‍यक्षिके दाखवून महिलांना, विद्यार्थ्‍यांना तसेच ग्रामस्‍थांना महत्‍वाच्‍या विविध कौटुंबिक आणि वैयक्तिक सक्षमीकरणासंबंधी सजग करण्‍यात येणार आहे. या करिता दृकश्राव्‍य साधने, मल्‍टीमिडीया, प्रदर्शने, व्हिडीओ फिल्‍म, साउंड बार, प्रात्‍यक्षिके, प्रत्‍यक्ष अनुभव इ. प्रभावी साधने व पध्‍दतीचा उपयोग करण्‍यात येणार आहे. अभियानांतर्गत पहिल्‍या फेरीमध्‍ये हिंगोली जिल्‍ह्यातील हट्टा, आडगांव आणि बोरी सावंत या उपक्रमास प्रत्‍यक्ष प्रारंभ करण्‍यात आला, त्‍यास ग्रामीण महिलां, विद्यार्थी तथा ग्रामस्‍थानी उत्‍स्‍फुर्त प्रतिसाद दिला. हट्टा येथे डॉ. रत्‍नमाला चटर्जी यांनी भेट देऊन सरपंच व उपस्थित महिलांशी संवाद साधला व उपक्रमास शुभेच्‍छा दिल्‍या. या कार्यक्रमात सदरील गावामध्‍ये महिलांना गर्भावस्‍थेत घ्‍यावयाची काळजी व महत्‍व या विषयावर सहयोगी अधिष्‍ठाता प्रा. विशाला पटनम यांनी तर सक्षम गृहिणींच्‍या आवश्‍यक जबाबदा-या व याकरीता घ्‍यावयाची विशेष खबरदारी व शेतीमधील कष्‍ट्प्रद कामे कमी करण्‍यासाठी उपयुक्‍त शेती अवजारे या विषयांवर विभाग प्रमुख डॉ. हेमांगीनी सरंबेकर यांनी मार्गदर्शन केले. मौजे आडगांव आणि बोरी सावंत येथे गृह विज्ञान शिक्षण आणि दर्जेदार बाल शिक्षणाची गरज या विषयांवर अनुक्रमे डॉ. जया बंगाळे व डॉ. वीणा भालेराव यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्‍या शेवटी तज्ञांनी केलेल्‍या मार्गदर्शनावर आधारित प्रश्‍न मंजुषा घेवून अचुक उत्‍तरे देणा-या लाभार्थ्‍यांना उत्‍कृष्‍ट श्रोता पुरस्‍कार देण्‍यात आले. इलेक्‍ट्रॉनिक साधनांच्‍या सहाय्याने उपयुक्‍त घोषवाक्‍यांच्‍या माध्‍यमातून गावांमधून जागरुकता निर्माण केली. कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेसाठी विभाग प्रमुख डॉ. प्रभा अंतवाल, डॉ. शंकर पुरी, चित्रा बेलूरकर, रेश्‍मा शेख, ज्‍योत्‍स्‍ना नेर्लेकर, संगीता नाईक, मंजुषा रेवणवार, रुपाली पतंगे व अर्चना भोयर आदीनी परीश्रम घेतले. 

Tuesday, November 26, 2013

कराड येथील राष्ट्रिय कृषि प्रदर्शनातील विद्यापीठाच्‍या दालनास मुख्‍यमंत्री व उपमुख्‍यमंत्री यांची भेट

विद्यापीठाचे दालनास महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या मा मुख्‍यमंत्री मा ना श्री पृथ्‍वीराजजी चव्‍हाण व मा उपमुख्‍यमंत्री मा ना श्री अजितदादा पवार यांनी भेट दिली त्‍यावेळी माहिती देतांना विद्यापीठाचे श्री वैजनाथ सातपुते.


स्‍वर्गीय यशवंतराव चव्‍हाण यांच्‍या 29 व्‍या स्‍मृती दिनानिमित्‍त दि. 24 ते 28 नोव्‍हेबर 2013 दरम्‍यान कराड येथे 10 वे यशवंतराव चव्‍हाण कृषि औद्योगीक व पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्‍यात आले असुन या प्रदर्शनाचे उदघाटन मा मुख्‍यमंत्री मा ना श्री पृथ्‍वीराजजी चव्‍हाण यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. या प्रदर्शनात या प्रदर्शनात राज्‍यातील चारही कृषि विद्यापीठे, कृषि विभाग, विविध कंपन्‍या आदीचे दालने उभारण्‍यात आले असुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे दालनास महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या मा मुख्‍यमंत्री मा ना श्री पृथ्‍वीराजजी चव्‍हाण व मा उपमुख्‍यमंत्री मा ना श्री अजितदादा पवार यांनी दि 25 नोव्‍हेबर रोजी भेट दिली. विद्यापीठाच्‍या दालनात विद्यापीठाने विकसीत केलेले विविध तंत्रज्ञान, पिकांचे विविध वाणे व नमुणे, अन्‍नतंत्रज्ञान महाविद्यालयाचे विविध प्रक्रिया पदार्थ ठेवण्‍यात आलेले आहेत. या दालनास मा मुख्‍यमंत्री व मा उपमुख्‍यमंत्री यांच्‍यासह कृषि‍ व पणन मंत्री मा ना श्री राधाकृष्‍णजी विखे पाटील, वनमंत्री मा. ना. श्री पतंगराव कदम, पशुसंवर्धन व दुग्‍धव्‍यवसाय मंत्री मा. ना. श्री मधुकरराव चव्‍हाण, कृषि आयुक्‍त मा. श्री उमाकांतजी दांगट आदि मान्‍यवरांनी भेटी दिल्‍या. मा. मुख्‍यंमंत्री यांनी विद्यापीठाचा सोयाबीनच्‍या एमएयुएस-162 या वाणाची विशेष चौकशी केली. 
या विद्यापीठाच्‍या दालनास शेतक-यांनी मोठ्या संख्‍येनी शेतक-यांनी भेटी दिल्‍या असुन विद्यापीठाने विकसीत केलेल्‍या सोयाबीनचे वाण एमएयुएस-71 व एमएयुएस-162 या वाणाची विशेष मागणी करीत आहेत. विद्यापीठाचे विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण यांच्‍या मार्गदर्शनाखाली या कृषि प्रदर्शनात विद्यापीठाचे दालण मांडण्‍यात आले असून श्री वैजनाथ सातपुते व श्री संजय मोरे हे शेतक-यांना माहिती देत आहेत.

Monday, November 25, 2013

‘गृहविज्ञान आपल्‍या दारी : कुटुंबाचे कल्‍याण करी’ या अभिनव अभियानास प्रारंभ

‘गृहविज्ञान आपल्‍या दारी : कुटुंबाचे कल्‍याण करी’ या अभिनव अभियानाचे उदघाटन प्रसंगी दिल्‍ली ये‍थील भारतीय तंत्रज्ञान संस्‍थेच्‍या आंतरराष्‍ट्रीय किर्तीच्‍या नॅनो तज्ञा डॉ रत्‍नमाला चॅटर्जी , शिक्षण संचालक डॉ विश्‍वास शिंदे, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव श्री का वि पागीरे, गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या प्राचार्या प्रा विशाला पटणम व कृषि महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ बी व्‍ही आसेवार आदी

      वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत गृहविज्ञान विद्याशाखा इ. स. 1976 पासुन परभणी जिल्‍ह्यातील विविध खेड्यातून ज्ञान प्रबोधनाचे कार्य करत आहे. गृहविज्ञान विद्याशाखेत विद्यार्थ्‍यांना दिले जाणा-या विविध विषयाचे ज्ञान हे प्रत्‍येक कुटुंबाला, व्‍यक्‍तीला आवश्‍यक आणि सहजपणे अवलंब करता येण्‍यासारखे आहे, जेणेकरुन ग्रामीण कुटुंबांना त्‍यांचे जीवनमान तसेच राहणीमान उंचावण्‍यास मदत होते. असे हे गृहविज्ञान शाखेचे मराठवाड्यातील जिल्‍ह्यातील ग्रामीण भागातील कुटूंबाला मिळावे अश्‍या हेतुने गृहविज्ञान आपल्‍या दारी: कुटुंबाचे कल्‍याण करी या अभिनव अभियानाची कल्‍पना गृहविज्ञान विद्याशाखेच्‍या वतीने ग्रामीण कुटूंबांना गृहविज्ञानाचा अधिकाधिक फायदा व्‍हावा म्‍हणून नोव्‍हेंबर महिन्‍याच्‍या 23 तारखेपासून हे अभियानाचे उदघाटन दिल्‍ली ये‍थील भारतीय तंत्रज्ञान संस्‍थेच्‍या आंतरराष्‍ट्रीय किर्तीच्‍या नॅनो तज्ञा डॉ रत्‍नमाला चॅटर्जी , शिक्षण संचालक डॉ विश्‍वास शिंदे, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव श्री का वि पागीरे, गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्या प्रा विशाला पटणम व कृषि महाविद्यालयाचे प्रभारी सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ बी व्‍ही आसेवार यांच्‍या प्रमुख उपस्थिती दि 22 नोव्‍हेबर रोजी झाले. या अभियानांतर्गत प्रत्‍येक शनिवारी गृहविज्ञान तज्ञ, संशोधन सहयोगी, इतर स्‍थानिक तज्ञ यांचे दोन चमु दोन खेड्यात जाउन विविध विषयावर व्‍याख्‍याने, प्रात्‍यक्षिके, व्हिडीओ फिल्‍म आणि प्रदर्शनी यांच्‍या सहाय्याने तज्ञ प्रबोधन करतील. वातावरण्‍ निर्मितीसाठी इलेक्‍ट्रानिक माध्‍यमातुन ग्रामीण जीवनाचा दर्जा उंचावण्‍याशी सुसंगत घोषवाक्‍याचा गजर संपूर्ण गावभरात केला जाणार आहे. यात पुढील विषयावर विशेष मार्गदर्शन करण्‍यात येणार आहे.
1.     घ्‍या गृहविज्ञानाचे शिक्षण विकासाचे वरदानी दालन.
2.    स्त्रियांचे दरहजारी घटणारे प्रमाण : सामाजिक स्‍थैर्यावरील मोठे संकट
3.    सक्षम गृहिणी - आवश्‍यक खबरदारी आणि जबाबदारी
4.    स्‍वस्‍थ कौटुंबिक संबंध - स्‍वस्‍थ मानसीक आरोग्‍य
5.    महाभारत दर्शन - कौटुंबिक कल्‍याण दर्पण
6.    दर्जेदार बाल शिक्षण - पाल्‍याच्‍या उज्‍वल भविष्‍याची गुरुकिल्‍ली
7.    किशोरवयीन मुल्‍यांचे स्‍वयंकाळजी पाल्‍य पालकांतील संघर्षाचे समायोजन
8.    चांगले पोषण चांगले आरोग्‍य हीच खरी कौटुंबिक बचत / दौलत
9.    कौटुंबिक उत्‍पनास लावण्‍या हातभार गृहिणींनो करा लघु उद्योगाचा स्विकार
10.   पर्यावरणा विषयक आव्‍हाने : कुटुंबाची जबाबदारी
तसेच कार्यक्रमाच्‍या शेवटी तज्ञांनी केलेल्‍या प्रबोधनावर आधारीत 10 प्रश्‍न विचारले जातील सर्व प्रश्‍नांची अचुक उत्‍तरे देण्‍याच्‍या सहभागी व्‍यक्‍तीस उत्‍कृष्‍ट श्रवण पुरस्‍कार देण्‍यात येईल.


Friday, November 22, 2013

नॅनो तंत्रज्ञानात मनुष्‍याचे जीवन सुकर करण्‍याची मोठी शक्‍ती.....नॅनो तज्ञा डॉ रत्‍नमाला चॅटर्जी

दिल्‍ली ये‍थील भारतीय तंत्रज्ञान संस्‍थेच्‍या आंतरराष्‍ट्रीय किर्तीच्‍या नॅनो तज्ञा डॉ रत्‍नमाला चॅटर्जी मार्गदर्शन करतांना 
अध्‍यक्ष समारोपीय भाषणात शिक्षण संचालक डॉ विश्‍वास शिंदे मार्गदर्शन करतांना, व्यासपीठावर  नॅनोतज्ञा डॉ रत्‍नमाला चॅटर्जी, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर व कुलसचिव श्री का वि पागीरे, प्राचार्या प्रा विशाला पटणम व कृषि महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ बी व्‍ही आसेवार आदी 

कॅन्‍सर सारख्‍या आजारामध्‍ये केमोथेरपीमुळे रूग्‍नास अनेक दुष्‍परीणामास सामोरे जावे लागते, नॅनो तंत्रज्ञानामुळे हया प्रकारचे दुष्‍परिणाम कमी होणार आहे. नॅनो तंत्रज्ञानात मनुष्‍याचे जीवन सुकर करण्‍याची मोठी शक्‍ती आहे, असे प्रतिपादन दिल्‍ली ये‍थील भारतीय तंत्रज्ञान संस्‍थेच्‍या आंतरराष्‍ट्रीय किर्तीच्‍या नॅनो तज्ञा डॉ रत्‍नमाला चॅटर्जी यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात नॅनो तंत्रज्ञान : एक संशोधनात्‍मक दृष्टिक्षेप याविषयावर  नॅनोतज्ञा डॉ रत्‍नमाला चॅटर्जी यांचे व्‍याख्‍यान गृ‍हविज्ञान महाविद्यालय व कृषि महाविद्यालय यांच्‍या संयुक्‍त विद्यामाने आयोजित करण्‍यात आले होते, त्‍यावेळी त्‍या बोलत होत्‍या. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ विश्‍वास शिंदे होते तर संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर व कुलसचिव श्री का वि पागीरे, गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्या प्रा विशाला पटणम व कृषि महाविद्यालयाचे प्रभारी सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ बी व्‍ही आसेवार यांची प्रमुख उपस्थिती होती. 
     व्‍याख्‍यानात त्‍या पुढे म्‍हणाल्‍या की, कृषि क्षेत्रात अधिक उत्‍पादनासाठी, किड व रोगाचे निदान व व्‍यवस्‍थापन, जल व्‍यवस्‍थापन, उर्जा बचत, दुग्‍ध शास्‍त्र आदी शाखेत नॅनो तंत्रज्ञानाचा मोठा उपयोग होणार आहे. यावेळी त्‍यांनी पॉवर पाईन्‍टच्‍या मदतीने नॅनो तंत्रज्ञानाबाबत सविस्‍तर मार्गदर्शन केले. अध्‍यक्ष समारोपीय भाषणात शिक्षण संचालक डॉ विश्‍वास शिंदे म्‍हणाले की, नॅनो तंत्रज्ञानामुळे शेती क्षेत्रात क्रांतीकारक बदल होणार आहे. उपलब्‍ध तंत्रज्ञानाने न सोडविण्‍यात येणारे कृषि क्षेत्रातील अनेक प्रश्‍न नॅनो तंत्रज्ञानाने आपण सोडवु शकु.  
     कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्या प्रा विशाला पटणम यांनी केले. सुत्रसंचलन डॉ विना भालेराव तर आभार प्रदर्शन डॉ जया बंगाळे यांनी केले. व्‍याख्‍यानास विद्यार्थी, प्राध्‍यापकवृंद व कर्मचारीवृंदानी मोठया संख्‍येने उपस्थित होते. याच कार्यक्रमात गृ‍हविज्ञान महाविद्यालयचा गृहविज्ञान आपल्‍या दारी : कुटूबाचे कल्‍याण करी या अभिनव विस्‍तार शिक्षण कार्यक्रमाचे मान्‍यवरांच्‍या हस्‍ते उदघाटन करण्‍यात आले.