Public Relations Officer, Directorate of Extension Education, Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Parbhani - 431 402 (M.S.) (Maharashtra) INDIA
Saturday, October 17, 2015
Friday, October 16, 2015
वाचनाने व्यक्तीमत्व प्रगल्भ होते …………….कुलगुरु मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलू
मृदविज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभाग आणि भारतीय मृदविज्ञान संस्था शाखा परभणीच्या वतीने आयोजीत वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमात प्रतिपादन
परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील मृदविज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभाग आणि भारतीय मृदविज्ञान संस्था शाखा परभणीच्या वतीने डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवस १५ ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलू हे होते. प्रमुख वक्ते म्हणुन डॉ. मनोहर नलावडे तर विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य मा. रविंद्र देशमुख, विभाग प्रमुख डॉ. विलास पाटील, डॉ. सय्यद इस्माईल यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षीय भाषणात कुलगुरु मा डॉ बी व्यंकटेश्वरलु यांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हैद्राबाद येथील सहवासातील आठवंणीना उजाळा देऊन एक शास्त्रज्ञ ते राष्ट्रपती या प्रवासातील त्यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. वाचनाने व्यक्तीमत्व प्रगल्भ होते असे प्रतिपादन केले. प्रमुख वक्ते डॉ. मनोहर नलावडे यांनी डॉ ए पी जे अब्दुल कलाम, प्रेमचंद व डॉ. आंबेडकर यांच्या साहित्य वाचनाने अंतरीक प्रेरणा मिळते. पुस्तकाने व्यक्ती विनयशील होतो. आदर्श व्यक्ती बनन्यासाठी वाचन संस्कृती जपणे आवश्यक आहे, असे नमुद केले. कार्यकारी परिषद सदस्य रविंद्र देशमुख यांनीही आपले विचार यावेळी व्यक्त केले. याप्रसंगी संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना व मान्यवरांना महात्मा गांधी यांचे आत्मचरीत्र व महात्मा फुले यांचे शेतकऱ्यांचा आसुडही पुस्तके भेट देण्यात आली. तसेच डॉ. अब्दुल कलाम यांच्या जीवनवरील माहीती चित्रफीत सादर करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विलास पाटील यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. पपिता गौरखेडे तर आभार प्रदर्शन डॉ. महेश देशमुख यांनी केले. कार्यक्रमास डॉ. हरिहर कौसडीकर, डॉ. अनिल धमक, डॉ. सुरेश वाईकर, डॉ. शिराळे, डॉ. खंदारे, श्री अनिल मोरे यांच्यासह पदव्युत्तर विद्यार्थी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
वनामकृविच्या कृषि महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि महाविद्यालयाच्या वतीने वैद्यनाथ पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे वसतीगृहात दिन 15 ऑक्टोबर रोजी डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनाचे औजित्य साधुन ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ डि एन गोखले हे होते तर प्रमुख वक्ते ज्ञानोपासक महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ शिवा आयथाल, मुख्य वसतीगृह अधिक्षक डॉ के डि नवगीरे, संशोधन उपसंचालक डॉ जी के लोंढे, विद्यापीठ ग्रंथपाल डॉ जे पी जगताप, जनसंपर्क अधिकारी डॉ पी एस कापसे, रासेयोचे कार्यक्रम अधिकारी प्रा ए एस कांबळे, प्रा व्ही बी जाधव यांची उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ डि एन गोखले म्हणाले की, वाचन कला ही व्यक्तीमत्व विकासासाठी आवश्यक असुन विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनात वाचन संस्कृती जोपासली पाहिजे, त्यातुनच व्यक्तीचे विचार प्रगल्भ होतात आणि प्रगल्भ व्यक्तीमुळेच देशाचा लौकिक वाढतो.
प्रमुख वक्ते प्राध्यापक डॉ शिवा आयथाल यांनी वाचन कौशल्यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, वाचनामुळेच व्यक्त घडतो, वाचनाचा छंद जोपासणारा व्यक्ती जीवनात कोणत्याही परिस्थितीचा समाना करू शकतो. डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांनी अनेक प्रेरणादायी पुस्तके लिहीली, त्याचे वाचन करून आपल्या व्यक्तीमत्वात सकारात्मक बदल विद्यार्थ्यांनी करावा, असा सल्लाही त्यांनी दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ के डि नवगिरे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालक डॉ जी के लोंढे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा व्ही बी जाधव यांनी केले. यावेळी डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या पुस्तकाचे ग्रंथ प्रदर्शनीचेही आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास पदव्युत्तर विद्यार्थ्यी मोठया संख्येने उपस्थित होते.
Wednesday, October 14, 2015
जास्त पाणी लागणारी पिके केवळ ठिंबक वरच घ्यावीत..........कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु
ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत मौजे झरी येथे रबी शेतकरी मेळावा संपन्न
| मेळाव्यात मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा डॉ बी व्यंकटेश्वरलु |
| मेळाव्यात मार्गदर्शन करतांना प्रगतशील शेतकरी मा श्री कांतराव देशमुख |
हवामान बदलामुळे तापमानात वाढ होत असुन मराठवाडयातील पाऊसमान दिवसेंदिवस कमी
होत आहे, पाऊसाचे दिवस कमी होत आहेत. शेतीसाठी लागणा-या निविष्ठा बाजारातुन विकत घेता
येतात पंरतु पाणी मिळत नाही, म्हणुन जलसंधारणाला प्राधान्य देणे गरजेचे आहे. भुगर्भजलाची
पातळी वरचेवर कमी होत असुन विहीर व कुपनलिका पुर्नभरणावर भर दयावा लागेल. जास्त पाणी
लागणारी पिके केवळ ठिंबक वरच घ्यावीत, असे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु
यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि महाविद्यालय व अखिल
भारतीय समन्वयीत सोयाबीन संशोधन प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण
कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत परभणी तालुक्यातील मौजे झरी येथे दिनांक १३ ऑक्टोबर
रोजी आयोजीत रबी शेतकरी मेळाव्याच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. मेळाव्याच्या
अध्यक्षस्थानी प्रगतशील शेतकरी मा. श्री. कांतरावजी देशमुख हे होते तर विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले,
प्राचार्य डॉ. डी. एन. गोखले, सरपंचा सौ आश्विनीताई देशमुख, डॉ. जी. एम. वाघमारे, रावे
समन्वयक डॉ. राकेश अहिरे, डॉ एस पी म्हेत्रे, डॉ यु एन आळसे आदींची प्रमुख
उपस्थिती होती.
कुलगुरू मा डॉ बी व्यंकटेश्वरलु पुढे म्हणाले की, राजस्थान मध्ये कमी
पर्यन्यमान असुन शेतकरी आत्महत्याचे प्रमाण नाही, याचे मुख्य कारण शेतीपुरक
जोडधंदे असुन मराठवाडयातील शेतक-यांनी शेतीपुरक जोडधंद्याकडे वळावे. शेतक-यांना
अनेक संकटांना तोंड दयावे लागत असुन शेतकरी, शासन व विद्यापीठ सर्वांनी मिळुन या
परिस्थितीचा मुकाबला करू, असे प्रतिपादन त्यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात प्रगतशील शेतकरी
मा. श्री. कांतराव देशमुख म्हणाले की, विद्यापीठातील ग्रामीण कृषि
कार्यानुभवामुळे एक चांगले कृषि पदवीधर घडत असुन त्याचा लाभ कृषि विकासासाठी होत
आहे. विस्तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांनी आपल्या भाषणात हुमणी किडीचे व्यवस्थापनावर
मार्गदर्शन करून शेतक-यांनी सामुदायिकरित्या या किडीचे व्यवस्थापन करण्याचे
आवाहन केले तर प्राचार्य डॉ डि एन गोखले यांनी आपल्या भाषणात ग्रामीण कृषि
कार्यानुभवामुळे कृषिच्या विद्यार्थ्याच्या ज्ञान मोठी भर पडत असुन कृषिदुतांच्या
माध्यमातुन कृषि तंत्रज्ञान विस्ताराचेही कार्य होत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात रावे समन्वयक
डॉ. राकेश अहिरे यांनी ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमाचे
सुत्रसंचालन कृषिदुत नितीन ठोकर यांनी केले तर विजय घाटोळ यांनी आभार मानले. तांत्रिक
सत्रात लिंबुवर्गीय फळ लागवडीवर डॉ जी एम वाघमारे यांनी मार्गदर्शन केले तसेच रबी
ज्वारी लागवडीवर डॉ यु एन आळसे, करडई लागवडीवर डॉ एस बी घुगे, हरभरा लागवडीवर डॉ
पी के वाघमारे, पशुधन व्यवस्थापनावर डॉ ए टी शिंदे, रबी पिकांवरील किड व्यवस्थापनावर
डॉ डि जी मोरे, रेशीम उद्योगावर डॉ सी बी लटपटे तर रबी पिकांवरील रोग व्यवस्थापनावर
डॉ एस एल बडगुजर यांनी शेतक-यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास शेतकरी मोठया संख्येने
उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ एस पी म्हेत्रे व डॉ डि जी दळवी यांच्या
मार्गदर्शनाखाली कृषिदुत मंगेश गोरे, सुभाष इरतकर, वैजनाथ कदम, जीवन धोत्रे, राम
कदम, अजित गावडे, अमोल जोंधळे, व्दौपद घुगे, युवराज धावणे व गोपाळ डोंबे यांनी
परिश्रम घेतले.
| मेळाव्यात मार्गदर्शन करतांना विस्तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले |
| मेळाव्यात मार्गदर्शन करतांना प्राचार्य डॉ डि एन गोखले |
Tuesday, October 13, 2015
मराठवाडयात अनेक जिल्ह्यात हुमणी किडीचा मोठा प्रादुर्भाव
रब्बी हंगामातील हुमणीचे व्यवस्थापनासाठी शेतक-यांनी
सामुदायिक प्रयत्न करण्याचे वनामकृविचे आवाहन
मराठवाडयातील जिल्हामध्ये खरिप हंगामात सोयाबीन, कापूस, ज्वारी, ऊस, बाजरी, मका, तुर, हळद, कांदा इत्यादी पिकावर हुमणीचा मोठया प्रमाणात
प्रादुर्भाव होऊन शेतकऱ्याचे अतिशय नुकसान झाले असुन हुमणी ही एक अतिशय
नुकसानकारक बहुभक्षी कीड आहे. हुमणीची अळी जमिनीत राहून विविध पिकांच्या
मुळा कुरतडते. त्यामुळे
पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. रबी हंगामात पेरणी झाल्यानंतर या पिकाच्या उगवणीनंतर हुमणीच्या
अळया हरभरा, करडई, ज्वारी इत्यादी पिकावर
मुळा खाण्याची शक्यता असुन रोपावस्थेतच
मुळा कुतडल्यामुळे संपूर्ण रोप वाळून जाईल. तसेच सध्या खरिप
हंगामातील तूर, कापूस
इत्यादी या उभ्या पिकातदेखील हुमणीच्या प्रादुर्भावामुळे वाळत आहेत. हुमणीची अळीची अवस्था जुलै ते नोव्हेबर-डिसेंबर पर्यंत असते व
नंतर ही कोषावस्थेत जाते. म्हणून हुमणीच्या अळीपासून होणारे सद्य परिस्थितीतील नुकसान
टाळण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. यासाठी रबी हंगामात शेतकऱ्यांनी पुढील प्रमाणे हुमणीचे व्यवस्थापन करण्याचे आवाहन वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले आणि कृषि कीटकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. पी. आर. झंवर यांनी केले आहे.
सद्यस्थितीत
हुमणीचे व्यवस्थापन
• ज्या शेतकऱ्यांना रबी हंगामाचा घ्यावयाचा नाही त्यांनी खरिपातील पीक काढणीनंतर शेतात खोल नांगरट करावी व
पाळी मारावी. त्यामुळे
जमिनीतील अळया पृष्ठभागावर आल्यानंतर सुर्यप्रकाशामुळे किंवा पक्षी वेचून
खाल्यामुळे त्याचे व्यवस्थापन होण्यास मदत होईल.
• पिकामध्ये शक्य असेल तर
आंतरमशागत करावी व उघडया पडलेल्या अळया हाताने वेचून रॉकेलमिश्रीत पाण्यात बुडवून
मारुन टाकावे.
• रबी पिकांची पेरणी करतेवेळी फोरेट 10 टक्के दाणेदार हे कीटकनाशक 25 किलो प्रति हेक्टरी या
प्रमाणात जमिनीत मिसळावे व जमिनीमध्ये ओल असणे आवश्यक आहे.
• मेटारायझियम ॲनिसोप्ली
या उपयुक्त बुरशीचा 10 किलो प्रति हेक्टर या प्रमाणात जमिनीतून वापर करावा. ही बुरशी हुमणीच्या
अळयांना रोगग्रस्त करते, त्यामुळे अळयांचा बंदोबस्त होतो.
• तसेच फिप्रोनील 40 टक्के + इमिडाक्लोप्रीड 40 टक्के हे मिश्र
कीटकनाशक 4 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून ऊस व इतर पिकाच्या झाडाभोवती आळवणी करावी.
वरील उपाययोजना ही केवळ सद्यपरिस्थितीतील पिकांना हुमणीच्या अळयापासून होणारे
नुकसान कमी करण्यासाठी
आहेत. हुमणीच्या
संपूर्णपणे व्यवस्थापन करण्यासाठी 2 ते 3 वर्ष प्रौढ व अळया यांचे एकात्मिक व्यवस्थापन करणे
आवश्यक असुन विशेषत: खरीप हंगामात मृगाचा पाऊस झाल्यानंतर हुमणीचे भुंगे कडुनिंब, बाबुळ, बोर इत्यादी झाडाच्या पांनावर रात्रीच्यावेळी भुंगे खात असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी सामुहिकरित्या बंदोबस्त करावा. त्यासाठी प्रकाशसापळयाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात येते.
Subscribe to:
Posts (Atom)








