वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनाच्या वतीने दिनांक ३१ मार्च रोजी विद्यापीठाच्या स्थापनेचे सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औजित्य साधुन विद्यापीठ परिसरात वृक्षारोपण केलेल्या वृक्षांना आच्छादन तसेच परीसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आला. याप्रसंगी कुलगुरू मा डॉ. अशोक ढवण, वृक्ष लागवड समन्वयक डॉ. हिराकांत काळपांडे, जिमखाना उपाध्यक्ष डॉ. संजीव बंटेवाड, डॉ. नेहारकर, डॉ. मिलींद सोनकांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. सदरील अभियानामध्ये ८० पेक्षा जास्त छात्रसैनिकांनी लागवड करण्यात आलेल्या वृक्षांना आच्छादन करुन परीसर स्वच्छता केला. सदरील अभियानाकरीता ५२ महाराष्ट्र बटालियन, एन.सी.सी., नांदेड चे कमाडिंग ऑफिसर श्री. एम. रंगाराव यांनी शुभेच्छा दिल्या. अभियानाच्या यशस्वीतेसाठी लेप्टनंट डॉ. जयकुमार देशमुख, ज्ञानेश्वर पवार, अजय गुट्टे, संदीप व्हावळे, संदीप देवकत्ते, गोविंद शिंदे आदींनी परीश्रम घेतले.