Friday, July 1, 2022

मौजे पारवा येथे वृक्षारोपण आणि पशुंचे लसीकरण मोहिम संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील परभणी कृषी महाविद्यालय, करडई संशोधन केंद्र व जिल्हा पशुवैद्यकीय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत दिनांक १ जुलै रोजी माजी मुख्‍यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेते स्‍व. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्‍त कृषि दिनी मौजे पारवा येथे वृक्षारोपण आणि घटसर्प व फऱ्या रोग प्रतिबंध पशु लसीकरण मोहिम राबविण्‍यात आली. कार्यक्रमास सरपंच श्री मुंजाजी तरडे, पशुधन विकास अधिकारी डॉ सोळंकी, रावेचे कार्यक्रम अधिकारी डॉ डि जी दळवी, प्रमुख पाहुणे श्री सुरेश जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमात डॉ डि जी दळवी यांनी शेती विषयी व पशुसंवर्धनाबद्दल मार्गदर्शन केले तर डॉ. सोळंकी यांनी पशुंच्या व्यवस्थापनाबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा आंधळे व आभार विजया आठवले यांनी मानले. कार्यक्रमास गावातील शेतकरी, शाळेतील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृषीकन्या आयुषी आचार्य, देवकी नायर, खुशबू भाटिया, सीसीलिया, मनीषा कुमारी, मोनिका गोप, रिंकी लांबा, शेल बाला, सृष्टी गुप्ता, श्रुतीचंद्रन, स्वागता लक्ष्मीदास, स्वाती पटेल आदींनी परिश्रम घेतले. सदर रावे कार्यक्रम प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल, रावे समन्वयक डॉ. राजेश कदम, करडई संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. एस बी घुगे, सहसम्न्वयक डॉ प्रविण कापसे, कार्यक्रम अधिकारी डॉ. डि जी दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्‍यात आला.