Wednesday, December 11, 2024

मतदान जनजागृती अभियानातील स्पर्धेत सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील श्रावणी जाधव हिचे यश


मतदान जनजागृती अभियानांतर्गत शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित वक्तृत्व स्पर्धेत वसंतराव नाईक मराठवाडा  कृषि विद्यापीठाच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात पदवी शिक्षण घेत असलेल्या श्रावणी पोपटराव जाधव या  विद्यार्थिनीने  तृतीय क्रमांक प्राप्त केला. परभणी जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या पुढाकाराने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मतदार जागृती अभियान (SVEEP) राबविण्यात आले. या अभियानाचा मुख्य उद्देश नागरिकांमध्ये मतदानाबाबत जागरूकता निर्माण करणे हा होता. स्पर्धेतील विजेत्यांना २६ जानेवारी २०२५ रोजी गणराज्य दिनाच्या दिवशी विशेष सन्मान करण्यात येणार असून विजेत्यांना रोख बक्षिसे आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती मतदान जनजागृती अभियानाचे नोडल अधिकारी प्रा. डॉ. गणेश शिंदे यांनी दिली. सदरील स्पर्धेत श्रावणी जाधव  हिने प्राप्त केलेल्या  यशाबद्दल महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. जया बंगाळे, सर्व विभाग प्रमुख डॉ नीता गायकवाड, डॉ. वीणा भालेराव, डॉ. शंकर पुरी, जिमखाना उपाध्यक्ष डॉ. विद्यानंद मनवर इतर प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आहे.