वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठाच्या उद्यानविद्या महाविद्यालयांमध्ये कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांच्या
मार्गदर्शनाखाली व कुलसचिव श्री संतोष वेणीकर यांच्या निर्देशानुसार दिनांक 3 डिसेंबर रोजी कृषी शिक्षण दिन
उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी संचालक शिक्षण डॉ. बी. व्ही.आसेवार तर
प्रमुख अतिथी म्हणून विस्तार शिक्षण संचालक डॉ. जी. एम.वाघमारे तसेच प्रमुख पाहुणे
म्हणून महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण मंत्रालय विभागातील कक्ष अधिकारी श्री
रामदास धुमाळ व परभणी येथील कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री दिपक दंतुलवार
यांची उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणामध्ये डॉ.
बी. व्ही. आसेवार यांनी विद्यार्थ्यांना कृषी शिक्षणाचे महत्त्व विशद केले. आपला
भारत देश हा कृषिप्रधान असल्यामुळे इतर पदवीमध्ये शिक्षण घेण्यापेक्षा कृषी
शिक्षणामधील पदवीद्वारे नोकरीच्या संधी अधिक उपलब्ध होत आहेत. तसेच विद्यार्थ्यांनी
कृषी शिक्षणामध्ये आपले ध्येय ओळखून यश मिळवावे व उज्वल भविष्य घडवावे असे
प्रतिपादन केले.
विस्तार शिक्षण संचालक डॉ.
जी. एम. वाघमारे म्हणाले की, भारताच्या वाढत्या अर्थव्यवस्थेमध्ये कृषीचे महत्त्व
अधिक आहे. सर्वच बाबीमध्ये कृषीचा वाटा आहे. यामध्ये कृषी शिक्षण महत्वाची भूमिका
बजावते असे नमूद केले.
श्री रामदास धुमाळ यांनी
कृषीचे शिक्षण घेऊन विद्यार्थी स्पर्धा परीक्षेद्वारे महाराष्ट्र व भारत सरकारच्या
कृषी खात्यातील पदांवर कसा पोहोचू शकतो, आणि
पदवीच्या चार वर्षांमध्ये घेतलेल्या ज्ञानाचा साठा एक विद्यार्थी मिळालेल्या पदावर
कसा विकसित करु शकतो याबाबत मार्गदर्शन केले. श्री दीपक दंतुलवार म्हणाले की, कृषी
विभागाचे शिक्षण घेऊन भविष्यात कोणत्याही पदावर गेलो तरीही आपण घेतलेल्या शिक्षणा
सोबतची नाळ जुळवून ठेवावी. कार्यक्रमाची प्रस्तावना विद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता
व प्राचार्य डॉ. व्ही. एस. खंदारे यांनी मांडली.
या कार्यक्रमासाठी
महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, प्राध्यापक डॉ.
बी.एम. कलालबंडी, डॉ.भोसले, डॉ.व्ही.व्ही.भगत,
डॉ.ए.एस.लोहकरे, डॉ. एस. आर. वानखेडे डॉ.
एस.बी.पावने, डॉ. एस. जी. खंडागळे, ज्योती
कळंबे डॉ. पालेपाड तसेच कर्मचारी एस. सी. पठाण, सतीश पुंड,
श्री मुकाडे, श्री देशमुख आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन स्वाती पुंड तर आभार प्रदर्शन कृष्णा भोईते यांनी केले.