वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिला शेतकऱ्यांचे शेतीकामातील श्रम बचतीसाठी
विद्यापीठ विकसित अवजारे व यंत्रे याविषयावर ऑनलाईन मार्गदर्शन दिनांक १० डिसेंबर रोजी
करण्यात आले. अध्यक्षस्थानी कुलगुरु मा. (प्रा.) डॉ. इन्द्र मणि हे होते.
अध्यक्षीय मार्गदर्शनात कुलगुरु
मा.
प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले
की, शेती उद्योगांमध्ये महिला देखील पुरुषांच्या बरोबरीनेच कार्य
करत असून त्यांची संख्या आणि महत्त्व देखील कमी नाही. या महिलांचे श्रम बचत करण्यासाठी
विद्यापीठाने विविध साधने विकसित केलेले आहेत. या साधनांमुळे
शेतीकामातील श्रम कमी होऊन सुलभ पद्धतीने करण्यास मदत होते. विद्यापीठ
शेतीची उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीने विविध अवजारांच्या कार्य सुलभीकरण अभ्यासाचा
तत्वावर श्रम बचतीच्या अवजारे विकसित करीत आहे. यासाठी मानवाच्या
नैसर्गिक शारीरिक संस्थिच्या आणि मोजमापाच्या आधारे, वैज्ञानिक
पद्धतीचा अवलंब केला जातो. यामुळे महिलांना कार्य करत असताना
शरीरास आरामदायकता मिळून, जास्त काम केले जाते. या अवजारामुळे कमी वेळेत, न थकता आणि सुरक्षित पद्धतीने
अधिक कार्य केले जाते असे प्रतिपादन त्यांनी केले.
संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांच्या मार्गदर्शनाखाली सेंद्रीय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे
प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे यांनी कार्यक्रमाचे आयोजन आणि प्रस्ताविक
केले. तांत्रिक सत्रामध्ये प्रमुख मार्गदर्शिका शास्त्रज्ञ डॉ.
नीता गायकवाड यांनी महिलांचे शेतीतील अधिकचे श्रम कमी करण्यासाठी विद्यापीठाच्या
अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प (कृषीरत महिला) या योजनेद्वारे
विकसित केलेले सुधारित अवजारे व यंत्रे यांची ओळख करून वापर करण्याच्या पद्धतीसह उपयुक्तता
विशद केली. याबरोबरच अवजारांची देखभाल व दुरुस्ती आणि खरेदीसाठीची
किंमत व उपलब्धता याविषयी मार्गदर्शन केले. यामधे महिलांचे शेतीकामात
श्रम कमी करणे, कामे कमी वेळेत आणि सुलभपणे होणे, कार्यक्षमता वाढवणे आणि एकूणच उत्पादकता वाढविणे यावर सविस्तर माहिती दिली.
तदनंतर मागील आठवड्यामध्ये
विद्यापीठातील उल्लेखनीय कार्याची माहिती विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. शंकर पुरी यांनी दिली. कार्यक्रमात मराठवाड्यातील आठही
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. यावेळी शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना
विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. स्मिता सोळंकी, डॉ. संजय पाटील, डॉ. आनंद गोरे डॉ. नीता गायकवाड, डॉ.
वसंत सूर्यवंशी यांनी समाधानकारक उत्तरे दिली. सूत्रसंचालन आणि आभार आम्रपाली शिंदे यांनी मानले.