Wednesday, July 2, 2014

‘कृषि सांज वाहिनी’ चे उदघाटन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा उपक्रम
“कृषि सांज वाहिनी” च्‍या उदघाटन प्रसंगी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, शिक्षण संचालक डॉ विश्‍वास शिंदे, परभणी जिल्‍हा परिषदच्‍या अध्‍यक्षा श्रीमती मीनाताई बुधवंत, प्राचार्य डॉ. बी बी भोसले, प्राचार्य डॉ उदय खोडके, प्रगतशिल शेतकरी श्री. सुर्यकांतराव देशमुख, श्री. सोपानराव अवचार, श्री केशवराव बुधवंत, कृषि विकास अधिकारी श्री बळीराम कच्‍छवे, डॉ हेमा सरंबेकर , डॉ आनंद गोरे व उपस्थिती अधिकारी व शेतकरी.
“कृषि सांज वाहिनी” च्‍या उदघाटन प्रसंगी  सांज वाहिनी वर आलेल्‍या शेतक-यांच्‍या प्रश्‍नांना उत्‍तर देतांना शिक्षण संचालक डॉ विश्‍वास शिंदे सोबत विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण,  परभणी जिल्‍हा परिषदच्‍या अध्‍यक्षा श्रीमती मीनाताई बुधवंत, प्राचार्य डॉ. बी बी भोसले, श्री केशवराव बुधवंत आदी.
*******************************************************
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रामार्फत दर मंगळवारी सकाळी  ९ ते  ११  या वेळेत कृषि माहिती वाहिनी ही सेवा शेतक-यांसाठी नियमित चालविली जाते. यासेवेतंर्गत ०२४५२-२२९००० या दुरध्‍वनी क्रमांकावर मोठया संख्‍येने शेतकरी शेतीबाबतच्‍या विविध शंकाचे निरासन करण्‍यासाठी विद्यापीठाच्‍या तज्ञांशी संपर्क साधत असतात. आता या वाहिनीचा लाभ शेतक-यांना दर मंगळवारी संध्‍याकाळी ६ ते ८ या वेळेतही होणार आहे. यासाठी दि. १  जूलै २०१४  रोजी हरितक्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांच्‍या जन्‍मदिनी व कृषि दिनाचे औचित्‍य साधुन “कृषि सांज वाहिनी” चे उदघाटन करण्‍यात आले. या उदघाटन कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण हे होते तर शिक्षण संचालक डॉ विश्‍वास शिंदे, परभणी जिल्‍हा परिषदच्‍या अध्‍यक्षा श्रीमती मीनाताई बुधवंत, प्राचार्य डॉ. बी बी भोसले, प्राचार्य डॉ उदय खोडके, प्रगतशिल शेतकरी श्री. सुर्यकांतराव देशमुख, श्री. सोपानराव अवचार, श्री केशवराव बुधवंत, कृषि विकास अधिकारी श्री बळीराम कच्‍छवे, डॉ हेमा सरंबेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी शिक्षण संचालक डॉ विश्‍वास शिंदे आपल्‍या भाषणात म्‍हणाले कि, कृषि सांज वाहीनी सुरू करणार कदाचित देशातील पहिले विद्यापीठ असुन, यामुळे शेतकरी व कृषि विद्यापीठ यांच्‍यातील नाते दृढ होण्‍यास मदत होणार आहे.
विद्यापीठ शेतक-यांच्‍या अडीअडचणी सोडविण्‍यासाठी सदैव तत्‍पर असते, या वाहिनीमुळे अजुन एक चांगले माध्‍यम शेतक-यांच्‍या शेतीच्‍या समस्‍या सोडविण्‍यासाठी विद्यापीठाने खुले केले आहे, अशी भावना पर‍भणी जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा श्रीमती मीनाताई बुधवंत यांनी आपल्‍या भाषणात व्‍यक्‍त केली. तर परभणी कृषि महाविद्यापीठाचे प्राचार्य डॉ बी बी भोसले मनोगतात म्‍हणाले कि, कृषि विद्यापीठ अनेक माध्‍यमातुन शेतक-यांपर्यंत पोहचण्‍याचा प्रयत्‍न करीत असुन या कृषि सांज वाहिनी हे अजुन एका माध्‍यमाचा समावेश झाला आहे.
अध्‍यक्षीय समारोपात विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण म्‍हणाले कि, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ नवनवीन विस्‍तार कार्यक्रमाच्‍या मार्फत शेतक-यांच्‍या बांधपर्यंत तंत्रज्ञान पोहचविण्‍याचे कार्य करीत असते, त्‍याचाच एक भाग म्‍हणजे ही कृषि सांज वाहिनी. या वाहिनीमुळे शेतकरी बांधव आपली शेतीची कामे आटोपुन गावात एकत्र बसुन सायंकाळाच्‍या वेळी वाहिनीवर विद्यापीठ तज्ञांशी प्रश्‍न विचारू शकतील, तरी अधिकाधिक शेतकरी बांधवांनी या वाहिनीचा लाभ घ्‍यावा असे आवाहन त्‍यांनी केले आहे.
     प्रगतशील शेतकरी श्री. सुर्यकांतराव देशमुख, श्री. सोपानराव अवचार, श्री केशवराव बुधवंत, कृषि विकास अधिकारी श्री बळीराम कच्‍छवे, प्रा. दिलीप मोरे, डॉ हेमा सरंबेकर आदींनी ही आपले मनोगत व्‍यक्‍त करून वाहिनीस शुभेच्‍छा दिल्‍या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री उदय वाईकर यांनी तर प्रास्‍ताविक डॉ आनंद गोरे यांनी केले.    
सदरिल वाहिनीची संकल्‍पना कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांची असुन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांच्‍या मार्गदर्शनाखाली डॉ आनंद गोरे यांनी याचा नियोजन आराखडा तयार केला आहे. या सांज वाहिनीचे काम कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्‍यवस्‍थापक डॉ. आनंद गोरे व त्‍यांचे सहकारी श्री. डी.डी. पटाईत व श्री. एस. बी. जाधव हे पाहणार असुन विद्यापीठातील विविध विषयतज्ञ त्‍यांना सहकार्य करणार आहेत.
या उदघाटन कार्यक्रमाच्‍या वेळी डॉ बी एम ठोंबरे, डॉ ए पी सुर्यवंशी, डॉ राकेश अहिरे, डॉ पी एन सत्‍वधर, प्रा. दिलीप मोरे, डॉ. ए. टी. शिंदे, डॉ एल बी चौलवार, डॉ. आनंद बडगुजर, डॉ जी पी जगताप, प्रा एस डी पायाल, डॉ शिवाजी शिंदे, डॉ ए एम भोसले, प्रा यु एन कराड तसेच विद्यापीठ अधिकारी, कर्मचारी व शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

बाभळगाव येथे सोयाबीन बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक

   वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्‍या ग्रामीण कृषी कार्यानुभवाच्‍या अखिल भारतीय समन्‍वयित कोरडवाहु संशोधन शेती प्रकल्‍पांतर्गत असलेल्‍या कृषिकन्‍यांनी बाभळगाव येथे दिनांक २८ जुन रोजी सोयाबीन बीज प्रक्रियेचे प्रात्‍यक्षिक करून दाखविले तसेच गांवातील शेतक-यांना बीजप्रक्रियेचे महत्‍व व पिकांसाठी जैविक खंताचा वापर कसा करावा याबाबत माहिती दिली.    हा कार्यक्रम वरिष्‍ठ शास्‍त्रज्ञ डॉ एल बी चौलवार व कार्यक्रम अधिकारी प्रा सुनिता पवार यांच्‍या मार्गदर्शनानुसार घेण्‍यात आला. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी कृषिकन्‍या सारीका गु्ट्टे, संजीवनी बारंगुळे, शारदा घोलप, राजश्री धोंडे, मनिषा दहे, पुनम जाधव, रूपाली इंगळे, शिवकन्‍या भरोसे, मीरा घुले, मोनाली देशमुख, सुजाता देशमुख, चेतना केसाटे, मनिषा गव्‍हाणे, स्‍वाती चव्‍हाण, गौरी दिक्षित, माधुरी भोसले, योगिता देसी, सोनी बुलरकर, प्रकृति मेश्राम, प्रीतु, लीनु, शमना, श्‍वेता, शिशीरा, श्रेया, सृष्‍टी, उत्‍तरा, आकांक्षा आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास गावातील शेतक-यांनी उत्‍स्‍फुर्त प्रतिसाद दिला. 

Tuesday, July 1, 2014

हरितक्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांची १०१ वी जयंती साजरी



महाराष्‍ट्राचे माजी मुख्‍यमंत्री आणि हरितक्रांतीचे प्रणेते कै. वसंतरावजी नाईक यांच्‍या १०१ व्‍या जयंतीनिमित्‍य वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात ‘कृषिदिन’ साजरा करण्‍यात आला. यानिमित्‍य शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ. विश्‍वास शिंदे यांच्‍या हस्‍ते कै. वसंतराव नाईक यांच्‍या पुतळयाचे पुजन करून विनम्र अभिवादन करण्‍यात आले. यावेळी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ. बी. बी. भोसले, गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या डॉ. हेमा सरंबेकर, उद्यानविद्या महाविद्यालयाचे डॉ. एस बी रोहीदास, विभाग प्रमुख डॉ. विलास पाटील, डॉ. भ. वि. आसेवार, डॉ. बी. एम. ठोंबरे, डॉ. राकेश अहिरे तसेच विद्यापीठातील अधिकारी, प्राध्‍यापकवृंद व कर्मचारी मोठया संख्‍येने उ‍पस्थित होते.

हरीतक्रांतीचे प्रणेते स्‍व. वसंतराव नाईक यांना विनम्र अभिवादन

Monday, June 30, 2014

स्‍व. वसंतराव नाईक - हरितक्रांतीचा दूत ................. डॉ. अशोक ढवण

हरित क्रांतीचे प्रणेते स्‍व वसंतराव नाईक यांचा जन्‍मदिन  1 जुलै रोजी संपुर्ण राज्‍यात 'कृषि दिन' म्‍हणुन साजरा केला जातो, त्‍या निमित्‍याने वनामकृविचे विस्‍तार शिक्षण संचालक डॉ.अशोक ढवण यांनी लिहीलेला लेख

डॉ. अशोक ढवण




Sunday, June 29, 2014

बाभळगावच्या शेतक-यांनी साधला ऑडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातुन कृषि विद्यापीठाशी संवाद

बाभळगावचे शेतकरी बाधव ऑडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातुन कृषि विद्यापीठाच्‍या शास्‍त्रज्ञांशी संवाद साधतांना 

परभणी तालुक्‍यातील मौजे बाभळगाव येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठामार्फत कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या मार्गदर्शनानुसार हवामान बदलानुरूप राष्‍ट्रीय कृषि उपक्रम राबविण्‍यात येत असुन विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतक-यांच्‍या शेतापर्यंत पोहचविण्‍याचे कार्य होत आहे. कोरडवाहु शेतीच्‍या तंत्रज्ञानावर आधारित विविध पीक प्रात्‍यक्षिके गावात राबविण्‍यात आले असुन कोरडवाहू तंत्रज्ञानाचा मोठा प्रसार व प्रचार होण्‍यास मदत झाली आहे. नुकतेच विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी बाभळगांव येथील दिलेल्‍या भेटी दरम्‍यान शेतक-यांना ऑडीओ कॉनफरन्सिंगच्‍या माध्‍यमातुन विद्यापीठाशी जोडावे असे सुचित केले होते. विद्यापीठ तंत्रज्ञानाचा लाभ केवळ लाभार्थी शेतक-यांनाच नव्‍हे तर संपुर्ण गावातील शेतक-यांना व्‍हावा यादृष्‍टीने बाभळगांव येथे दि 21 जुन रोजी खरीप पुर्व शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते. या मेळावात कोरडवाहु शेती संशोधन केंद्रातर्फे डॉ एस बी चौलवार यांच्‍या मार्गदर्शनाखाली बाभळगांव येथील शेतक-यांसाठी कृषि विद्यापीठ व रिलायन्‍स फांऊडेशन यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने ऑडीओ कॉन्‍फरन्सिंगचे आयोजन करण्‍यात आले होते. या कार्यक्रमात परभणी येथुन कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रातुन वरिष्‍ठ शास्‍त्रज्ञ डॉ आनंद गोरे यांनी बाभळगांव येथील शेतक-यांना खरिप पिकांचे लागवड तंत्रज्ञान व कोरडवाहु शेती तंत्रज्ञान यावर मार्गदर्शन केले. तसेच शेतकरी बांधवानी विचारलेल्‍या विविध प्रश्‍नांना विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी उत्‍तरे दिली. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी शेतकरी श्री माऊली पारथे, रिलायन्‍स फाऊडेशनचे दिपक केकान, निलेश डंबारे, अमोल मोते यांनी परिश्रम घेतले. हा कार्यक्रम अतिशय उपयुक्‍त असल्‍याची प्रतिक्रीया ज्ञानोबा पारधे, विठ्ठल पारधे, गुलाब दळवे, विजय घोरपडे, कैलास धुमाळ, उत्‍तम दळवे, ज्ञानोबा दळवे यांनी व्‍यक्‍त केले. 

Saturday, June 28, 2014

कृषि दिनी “कृषि सांज वाहिनी” शेतक-यांच्‍या सेवेत

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा उपक्रम

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रामार्फत दर मंगळवारी सकाळी ९ ते ११ या वेळेत कृषि माहिती वाहिनी ही सेवा शेतक-यांसाठी नियमित चालविली जाते. या सेवेतंर्गत ०२४५२-२२९००० या दुरध्‍वनी क्रमांकावर मोठया संख्‍येने शेतकरी शेतीबाबतच्‍या विविध शंकाचे निरासन करण्‍यासाठी विद्यापीठाच्‍या तज्ञांशी संपर्क साधत असतात. सदरिल सेवा सायंकाळीच्‍या वेळेत सुरू करण्‍याची मागणी शेतकरी बांधवांनी केली. तसेच विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यकंटेश्‍वरलु यांच्‍या संकल्‍पनेतुन व निर्देशानुसार तसेच विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण यांच्‍या मार्गदर्शनाखाली कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्‍या माध्‍यमातुन कृषि माहिती वाहिनी ही दर मंगळवारी सकाळी ९ ते ११  या वेळे शिवाय दि. १ जूलै २०१४ रोजी वसंतराव नाईक यांच्‍या जन्‍मदिनी व कृषि दिनाचे औचित्‍य साधुन दर मंगळवारी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत शेतकरी बंधु-भगिनींसाठी चालविण्‍यात येणार आहे. यावेळेत विद्यापीठाचे विविध विषयातील तज्ञ शेतक-यांचे प्रश्‍न, समस्‍या सोडविण्‍यासाठी व तंत्रज्ञान प्रसारासाठी उपलब्‍ध असणार आहेत. या वाहिनीचे काम कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्‍यवस्‍थापक डॉ. आनंद गोरे व त्‍यांचे सहकारी श्री. डी.डी. पटाईत व श्री. एस. बी. जाधव हे पाहणार असुन विद्यापीठातील विविध विषयतज्ञ त्‍यांना सहकार्य करणार आहेत. यासाठी माध्‍यम मार्गदर्शक म्‍हणुन पुणे येथील अॅग्रोवनचे वरिष्‍ठ उपसंपादक श्री. मंदार मुंडले सहकार्य करणार आहेत.
या प्रकाराची कृषि सांज वाहिनी सुरू करणारे कदाजीत देशातील पहिले कृषि विद्यापीठ असावे. या वाहिनी मुळे शेतकरी बाधव आपली शेतीची कामे आटोपुन गावात एकत्र बसुन सायंकाळाच्‍या वेळी वाहिनीवर प्रश्‍न विचारू शकतील. तरी या वाहिनीचा लाभ अधिकाधिक शेतकरी बांधवांनी घ्‍यावा असे आवाहन केंद्र प्रमुख डॉ आनंद गोरे यांनी केले आहे.
विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ डॉ. पी एन सत्‍वधर, प्रा. दिलीप मोरे, पशुसंवर्धन व दुग्‍धशास्‍त्राचे डॉ. ए. टी. शिंदे, कोरडवाहु संशोधन केंद्राचे डॉ एस बी चौलवार, किटकशास्त्रज्ञ डॉ. आनंद बडगुजर, डॉ दयानंद मोरे, डॉ पी बी केदार, वनस्‍पती विकृ‍ती शास्त्रज्ञ डॉ जी पी जगताप, डॉ एस एल बडगुजर, कृषि अभियांत्रिकी विभागाचे प्रा एस डी पायाल, प्रा डी डी टेकाळे, उद्यानविद्या शास्‍त्रज्ञ डॉ शिवाजी शिंदे, डॉ ए एम भोसले, मृदशास्‍त्रज्ञ प्रा यु एन कराड, कृषि विद्या विभागाचे प्रा पी के वाद्यमारे, प्रा सौ एस यु पवार, डॉ विशाल अवसरमल शेतक-यांना मार्गदर्शन करण्‍यासाठी निवडक दिवशी उपलब्‍ध असणार आहेत.
वाहिनीची संकल्‍पना कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांची असुन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांच्‍या मार्गदर्शनाखाली डॉ आनंद गोरे यांनी याचा नियोजन आराखडा तयार केला असुन शिक्षण संचालक डॉ विश्‍वास शिंदे, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, डॉ बी बी भोसले, डॉ डी एन गोखले, डॉ बी व्‍ही आसेवार, डॉ यु एम खोडके, प्रा विशाला पटनम, डॉ व्‍ही डी पाटील, डॉ जी एम वाघमारे, डॉ बी बी ठोंबरे, डॉ डी एन धुतराज, डॉ ए पी सुर्यवंशी, डॉ आर डी आहिरे यांचेही मार्गदर्शन लाभले आहे. ¦Ê®úÉÊ#