Monday, August 3, 2020

कृषि प्रक्रिया उद्योजकांच्या यशोगाथा राज्यस्तरीय ऑनलाईन वेबीनारचा समारोप

भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली आणि वर्ल्ड बँक पुरस्‍कृत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप), ऑल इंडिया फुड प्रोसेसर असोशिएशन, नवी दिल्ली आणि फार्म टु फोर्क सोल्युशन्स, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने "डिजीटल तंत्रज्ञानाद्वारे कृषि प्रक्रिया उद्योग: उद्योजकांच्या यशोगाथा" या दिनांक 27 ते 31 जुलै दरम्‍यान आयोजित एक आठवडयाच्या राज्यस्तरीय ऑनलाईन वेबीनारच्या समारोप समारंभ दिनांक 31 जुलै रोजी संपन्न झाला.

कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ. अशोक ढवण हे होते तर प्रमुख अतिथी अन्न व औषध प्रशासन विभागाचे (महाराष्ट्र शासन) मा आयुक्त मा. डॉ. अरुण उन्हाळे, विशेष अतिथी म्‍हणुन नाहेप प्रकल्‍पाचे राष्ट्रीय संचालक डॉ. आर. सी. अग्रवाल, नवी दिल्ली येथील अखिल भारतीय अन्न प्रक्रिया उद्योजक संघटनाचे अध्‍यक्ष मा. श्री सुबोध जिंदाल, विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयातील जैवतंत्रज्ञान विभागाच्‍या संचालिका मा. डॉ. संगिता कस्तुरे, नाहेप प्रकल्‍पाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ प्रभात कुमार, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ. अरविंद सावते, वेबिनारचे सहआयोजक अखिल भारतीय अन्न प्रक्रिया उद्योजक संघटना (.विभाग) चे अध्यक्ष डॉ.प्रबोध हळदे, मुंबई येथील फार्म टू फोर्क सोल्युशन्सचे संचालक श्री उमेश कांबळे, नाहेप प्रकल्प, वनामकृविचे मुख्य अन्वेशक डॉ. गोपाळ शिंदे आदींची उपस्थिती होती.

मार्गदर्शनात मा. डॉ. अरुण उन्हाळे म्‍हणाले की, शेतमाल प्रक्रिया व मुल्यवर्धन उद्योगास भविष्यात मोठा वाव असुन कृषीचे विद्यार्थ्‍यी, ग्रामीण युवक तथा शेतकरी बांधव यांना नवउद्योग उभारण्‍यास निश्चितच मदत करता येईल. आज अन्नतंत्र महाविद्यालयातील बरेचशे विद्यार्थी अन्न व औषद प्रशासन विभागात अन्न सुरक्षा अधिकारी, सहाय्यक अन्न आयुक्त या महत्वाच्या पदांवर कार्यरत असुन कृषि उद्योजकांना लागणारी कोणत्याही प्रकारची मदत करण्याचे आश्वासन त्‍यांनी दिले.

अध्यक्षीय समारोपात मा डॉ. अशोक ढवण यांनी अन्नप्रक्रियेसंबंधी नुकतेच शासनाने जाहीर झालेले धोरनात्मक निर्णय निश्चितच असुन शेतक-यांनी व उदयोन्मुख नवउद्योजकांना यांचा लाभ घ्‍यावा. विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी मराठवाडयातील मुख्‍य पिकांशी निगडीत एखादा सखोल प्रकल्प अहवाल तयार करण्याचे त्‍यांनी सुचित केले.

विशेष अतिथी मा. श्री सुबोध जिंदाल यांनी अन्न प्रक्रिया उद्योगाची सद्यस्थिती बद्दल माहिती देऊन विद्यापीठानी संस्करण अनुकुल नवीन वानांची निर्मिती करण्याबाबत सुचना केली. तसेच मा. डॉ. संगिता कस्तुरे यांनी महाराष्ट्र शासनाच्या जैवतंत्रज्ञान विभाग अंतर्गत अस्तित्वात असलेल्या विविध अर्थ सहाय्य योजना तथा कार्यप्रणाली बद्दल माहिती देतांना परभणी कृषि विद्यापीठाकडुन नाविण्यपुर्ण प्रकल्प अहवाल सादर करण्‍यास मदतीचे आश्वासन दिले. स्वागतपर भाषणात डॉ. धर्मराज गोखले यांनी आत्मविश्वासाच्या जोरावर कुठल्याही परिस्थीतीवर मात करुन यश संपादन करता येते असे प्रतिपादन केले.

वेबिनार मध्ये सहभागी झालेल्या सदस्यांनी प्रातिनिधीक स्वरुपात आपले मनोगत व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले व अशा प्रकारचे कार्यक्रम भविष्यातही सुरु राहतील अशी आशा व्यक्त केली. प्रास्‍ताविकात आयोजन सचिव प्रा.डॉ.राजेश क्षीरसागर यांनी वेबीनार आयोजित करण्या मागची भुमिका व महत्व याबद्दल माहिती दिली. सुत्रसंचालन प्रा.अनुप्रिता जोशी यांनी केले तर आभार डॉ. भारत आगरकर यांनी मानले. वेबीनार मध्‍ये देशातुन १८ यशस्वी उद्योजकांना मार्गदर्शन तथा थेट संवादासाठी आमंत्रीत करण्यात आले होते. वेबीनारसाठी सुमारे २२०० जणांनी ऑनलाईन नोंदणी केली होती, त्यात ५० टक्के विद्यार्थी, २० टक्के महिला बचत गट सदस्य, १५ टक्के उद्योजक व ३० टक्के शेतकरी बांधवानी सहभाग नोंदवीला होता. यशस्वीतेसाठी प्रा. शाम गरुड, मुख्य ग्रंथपाल डॉ. संतोष कदम, डॉ.अविनाश काकडे, डॉ.रश्मी बंगाळे, डॉ.अमोल खापरे, डॉ. बी.. जाधव, एस.एम. सोनकांबळे आदींनी सहाय्य केले.