वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठतील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात दिनांक 13 ऑगस्ट रोजी जागतिक अवयव दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित चर्चासत्रात ऑनलाईन सहभागी होण्यासाठी झूम मिटींग सॉफ्टवेअरचा तर प्रत्यक्ष व्याख्यान कक्षात तज्ञांचे व्याख्यान आयोजित केले होते.
कार्यक्रमात परभणी शहरातील ज्यांच्या वडिलांचा
देहदान केला आहे, तसेच
अवयवदान व देहदानासाठी समाजात जनजागृती करणारे सामाजिक कार्यकर्ते श्री. विनोद
डावरे, परभणी शहरातील
मोरया हॉस्पिटल येथील सुप्रसिध्द बालरोग तज्ञ डॉ. अभिजित चिद्रवार यांनी मार्गदर्शन
केले.
मार्गदर्शनात श्री. विनोद डावरे यांनी
अवयवदान व देहदान यामधील फरक सांगून देहदान करण्यासाठी नैसर्गीक मृत्यु झाला तरच देहदान
करता येते तर अवयवदानासाठी ब्रेनडेड असेल तरच अवयवदान करता येते असे नमुद केले तर
डॉ. अभिजित चिद्रवार यांनी जीवंत आणि मृत्युनंतर अवयवदान आणि देहदान याबाबतच्या
तांत्रिक बाजु समजावुन सांगितल्या.
अवयव मिळण्यासाठी पुर्णपणे जेष्ठता यादी
आणि नियमांचे काटेकोर पालन केले जाते असे सांगुन जिवंतपणी आणि मृत्युनंतर दान
करण्यात येत असलेल्या अवयवाबद्दल माहिती दिली तसेच समाजामध्ये तज्ञ डॉक्टर निर्माण
होण्यासाठी मानवी देहाची आवश्यकता असल्याने देहदान करण्याचे तज्ञांनी आवाहन केले.
उदघाटन कार्यक्रमात कुलगुरू मा डॉ. अशोक
ढवण यांनी सहभागी होवुन अवयवदानाचे महत्व विषद करुन कृषिच्या एका विद्यार्थ्याचे
अवयवदान प्रक्रिया पुर्ण करतानाचा अनुभव कथन केला आणि अवयवदान व देहदान करण्याचे
आवाहन केले. तज्ञांनी सहभागींनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. कार्यक्रमाचे
आयोजन कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण यांच्या निर्देशानुसार आणि प्राचार्या डॉ. जयश्री
झेंड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सुनिता काळे यांनी केले. चर्चासत्रास
महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी,
विद्यार्थी,
गृहिणी
आणि शेतकरी वर्गाने उत्स्फू र्त सहभाग नोंदवला.