Monday, August 3, 2020

मक्‍यावरील लष्‍करी अळी जागरूकता व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

मराठवाडयातील औरंगाबाद व जालना जिल्‍हयात मका पिकाची मोठया प्रमाणात लागवड करण्‍यात येतेयावर लष्‍करी अळीचा प्रादुर्भाव लक्षात घेता वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि किटकशास्‍त्र विभागराष्‍ट्रीय कृषि उच्‍च्‍ा शिक्षण प्रकल्‍प (नाहेप), औरंगाबाद कृषि विभाग व नवी दिल्ली येथील साऊथ एशिया बायोटेक्‍नॉलॉजी सेंटर यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने मक्‍यावरील लष्‍करी अळी जागरूकता व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दिनांक ५ ऑगस्‍ट रोजी सायंकाळी ५.३० ते ८.०० दरम्‍यान झुम अॅप व युटुब्‍यच्‍या माध्‍यमातुन ऑनलाईन पध्‍दतीने करण्‍यात आले आहेकार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्‍हणुन कृषि शास्‍त्रज्ञ निवड समितीचे माजी अध्‍यक्ष तथा जेष्‍ट शास्‍त्रज्ञ मा डॉ चारूदत्‍त मायी हे उपस्थित राहणार असुन अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण राहणार आहेतशिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखलेसंशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकरविस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकरविभागीय कृषि सहसंचालक डॉ दिनकर जाधव आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

तांत्रिक सत्रात मका पिकाचे तर्कशुध्‍द लागवड तंत्रज्ञानलष्‍करी अळी व्‍यवस्‍थापनऔरंगाबाद विभागातील मक्‍यावरील लष्‍करी अळीची सद्यस्थितीलष्‍करी अळीचे एकात्मिक व्‍यवस्‍थापन आदी विषयावर नवी दिल्‍ली येथील आयआयएमआरचे माजी संचालक डॉ सैनदासएसएबीसीचे संचालक डॉ भगिरथ चौधरीविभागीय कृषि सहसंचालक डॉ दिनकर जाधवकिटकशास्‍त्रज्ञ डॉ बस्‍वराज भेदे आदी मार्गदर्शन करणार आहेतकार्यक्रमाच्‍या झुम मिटिंग मध्‍ये सहभाग घेण्‍यासाठी मिटिंग आयडी 941 535 0616 व पासवर्ड 12345 याचा वापर करावा.

सदरिल कार्यक्रम विद्यापीठाच्‍या युटुब्‍य चॅनेल www.youtube.com/user/vnmkv  यावर थेट प्रेक्षपण होणार असुन जास्‍तीत जास्‍त शेतक-यांनी कार्यक्रमात सहभागी व्‍हावेअसे आवाहन आयोजक विभागीय कृषि सहसंचालक डॉ दिनकर जाधवकृषि किटकशास्‍त्र विभागाचे प्रमुख डॉ संजीव बंटेवाड व नाहेपचे प्रमुख अन्‍वेषक डॉ गोपाळ शिंदे यांनी केले आहे.