Friday, August 14, 2020

गोळेगाव कृषि महाविद्यालयात अवयवदान जागृती कार्यक्रम संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या गोळेगांव येथील कृषि महाविद्यालयात दिनांक  १४ ऑगस्‍ट रोजी ऑनलाईन पध्दतीचा अवयवदान जागृतीकार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रम प्राचार्य डॉ. डी. बी. देवसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्‍यात आला.  कार्यक्रमास प्रमुख पाहून म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ. संजीवन लखमावार हे उपस्थित होते.

मार्गदर्शनात डॉ. संजीवन लखमावार म्‍हणाले की, दोन प्रकारे अवयव दान केले जाते, व्यक्ती जीवंत असताना काही अवयवदान करता येतात, जसे की, एक किडनी, यकृताचा काही भाग, फुफुसांनाचा काही भाग दान करता येतो. तर मेदूं मृत घोषित केल्या नंतर काही तास पर्यंत त्या व्यक्तीची किडनी, हृदय, यकृत, फुफुसे, नेत्र दान करता येते. अवयवदान हे जीवनदान आहे.

याप्रसंगी सर्व कर्मचा­यांनी भविष्यात अवयदान करण्याची प्रतीज्ञा घेतली. कार्यक्रमास डॉ. नारायण कु­हाडे, डॉ. शिवाजी शिंदे, डॉ. पी. आर. देशमुख, प्रा. अशोक मंत्री, प्रा. एस. एस. शिंदे, डॉ. डी. व्ही. बैनवाड, प्रा. वैशाली बास्टेवाड, डॉ. प्रवीण राठोड, डॉ. संतोष पवार, प्रा. अनंत ब्याळे, प्रा. सुभाष ठोंबरे, श्रीमती सारीका हवालदार, श्री. चौधरी, श्री. प्रवीण पंडित, श्री. शेख सलीम, श्री. बालाजी देवके, श्री. ताटीकोंडलवार, श्री. शिवाजी ठोंबरे, आदींनी  ऑनलाईन सहभाग नोंदविला.