अमेरिका, बेलारूस, लेबनान, अल्गेरीया, अर्जेटीना येथील जागतिकस्तरावरील तज्ञ करणार मार्गदर्शन
अमेरिकेच्या कृषि विभागाचे संचालक मा डॉ पराग चिटणीस यांचे विशेष मार्गदर्शन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील जागतिक बॅक व भारतीय कृषि संशोधन परिषद पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलंस, राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप) आणि आयएसए व आयएसजीपीबी शाखा परभणी वतीने ‘डिजीटल तंत्रज्ञानाव्दारे स्मार्ट शेती – भविष्यात्मक योजना’ यावर ऑनलाईन आतंरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन दिनांक १० ते १३ ऑगस्ट दरम्यान करण्यात आले असुन परिषदेच्या उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे राहणार असुन प्रमुख पाहुणे म्हणुन अमेरिकेच्या कृषि विभागाचे संचालक डॉ पराग चिटणीस उपस्थित राहणार आहे.
चार दिवस चालणा-या या परिषदेत अमेरिका, बेलारूस, लेबनान, अल्गेरीया, अर्जेटीना येथील जागतिकस्तरावरील तज्ञ डिजिटल तंत्रज्ञानाचा माध्यमातुन जागतिक शेती व भारतीय कृषि तंत्रज्ञानाचे भविष्यात्मक उपयोग व योजनात्मक यावर दृष्टीक्षेप टाकणार आहेत. तांत्रिक सत्रात दिनांक १० ऑगस्ट रोजी स्मार्ट शेतीकरीता जागतिक धोरण यावर अमेरिकेच्या कृषि विभागाचे संचालक मा डॉ पराग चिटणीस मार्गदर्शन करणार असुन यंत्र मानव व स्वयंचलित यंत्राव्दारे काटेकोर स्मार्ट शेतीवर लेबनान येथील अमेरीकन युनीवर्सीटी ऑफ टेक्नॉलॉजीचे संचालक डॉ मोस्तफा एमएल कुर्डी मार्गदर्शन करणार आहेत. दिनांक ११ ऑगस्ट रोजी बेलारूसीयन धरतीवर भारतीय स्मार्ट कृषि शिक्षण प्रक्रिया यावर बेलारूस येथील बेलारूसयन विद्यापीठाचे तज्ञ प्राध्यापक डॉ मिखाईल तातुर हे तर कृषि क्षेत्रात यंत्र मानवाचा वापर यावर अमेरिकेतील ऑरल रोर्बोट युनिवर्सीटीतील तज्ञ डॉ पावेल नवीटक्सी हे मार्गदर्शन करणार आहेत. दिनांक १२ ऑगस्ट रोजी अनुवंशीक पिक व्यवस्थापन पध्दतीनुसार कृषि यांत्रिकीकरण यावर अर्जेटीना येथील रोसारीओ राष्ट्रीय विद्यापीठाचे प्राध्यापक तज्ञ डॉ जेसल क्रिस्टोफर हे तर काटेकोर शेती व स्वयंचलीत तंत्रज्ञानाव्दारे विशेष पिक उत्पादन व्यवस्थापनावर अमेरिका येथील वाशिंग्टन स्टेट युनिवर्सीडीचे तज्ञ डॉ लव आर खोत मार्गदर्शन करणार आहेत. दिनांक १३ ऑगस्ट रोजी अल्गेरीया येथील फरहात अब्बास विद्यापीठाचे प्राध्यापक तज्ञ डॉ लाबाड रायमा हे अल्गेरीयातील प्रगत स्वयंचलित औषधी वनस्पती शेती पध्दतीवर मार्गदर्शन करणार आहेत. आंध्रप्रदेशचे भारतीय शेती व विकसित तंत्रज्ञानावर प्रा जयशंकर तेलंगाणा राज्य कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ व्ही प्रविणराव व रायपुर (छत्तीसगड) येथील कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ पी के घोष मार्गदर्शन करणार आहेत.
परिषदेकरिता विदेशातील तसेच देशातील विविध राज्यातील कृषि तज्ञ,शास्त्रज्ञ, प्राध्यापक व पदव्युत्तर विद्यार्थी यांनी सहभागासाठी नोंदणी केली आहे. भारतीय कृषि संशोधन परिषदेच्या नाहेप प्रकल्पाचे मुख्य संचालक डॉ आर सी अग्रवाल, राष्ट्रीय समन्वयक डॉ प्रभात कुमार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असुन परिषदेचे मुख्य आयोजक शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, विस्तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, नाहेप प्रकल्पाचे मुख्य अन्वेषक डॉ गोपाल शिंदे आहेत. आयोजन समितीत डॉ जे ई जहागिरदार, डॉ भगवान आसेवार, डॉ एच व्ही काळपांडे, डॉ आर व्ही चव्हाण, डॉ आय ए बी मिर्झा, डॉ एस व्ही कल्याणकर, डॉ जे डी देशमुख, डॉ पी के वाघमारे आदीचा सहभाग असुन तांत्रिक सहाय्य नाहेप टीम सदस्य इं खेमचंद कापगाते, डॉ अविनाश काकडे, डॉ रश्मी बंगाळे, इं रहीम खान, इं ताझीम खान , इं शैलेश शिंदे आदींचे राहणार आहे.