Wednesday, August 12, 2020

ऊस पीक व्यवस्थापन विषयी शेतकऱ्यांना ऑडिओ कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शन

वनामकृवी आणि रिलायन्स फाऊंडेशन चा उपक्रम

मराठवाडा विभागात उस पिकाकडे नगदी पिक म्हणून पाहिले जाते त्यामुळेच पाण्याची उपलब्धता असलेल्या तालुक्यामध्ये उस पिक लागवड केली जाते त्या करिता उस उत्पादक शेतकरी बांधवाना मार्गदर्शन मिळावे या उद्देश्याने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आणि रिलायन्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ऑडिओ कॉन्फरन्सद्वारे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये शेतकरी बांधवाना खोड कीड, करपा रोग, सेंद्रीय खते, रासायनिक खते, ठिबक सिंचनातून नत्र युक्त खते सूक्ष्म अन्नद्रव्ये, अंतर मशागत, पाणी व्यवस्थापन आदीवर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून संचालक विस्तार शिक्षण डॉ डी बी देवसरकर, विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ यु एन आळसे, डॉ पी आर झंवर आदी उपस्थित होते. शेतकरी बांधवानी विविध विषयावर प्रश्न विचारले, त्‍यांची उत्‍तरे तज्ञांनी दिली. या कॉन्फ्ररन्स मध्ये जिल्ह्यातील बहुसंख्य  शेतकरी बांधवांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे आयोजन परभणी जिल्हा व्यवस्थापक रिलायन्स फोन्डेशन विलास सवाणे व कार्यक्रम सहाय्यक रामाजी राऊत यांनी केले.