Saturday, August 15, 2020

वनामकृवितील मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागाच्‍या वतीने वृक्षारोपण

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागाच्‍या वतीने प्रक्षेत्रावर कुलगुरू मा डॉ. अशोक ढवण यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रंसगी शिक्षण संचालक डॉ. डि.एन. गोखले, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, कुलसचिव श्री. रंजीत पाटील, प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल, प्राचार्य डॉ. यु. एम. खोडके आदींची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्विततेसाठी डॉ. प्रविण वैद्य, डॉ. अनिल धमक, डॉ. महेश देशमुख, डॉ. एस.एल. वाईकर, डॉ. रामप्रसाद खंदारे, डॉ. एस.पी. झाडे, डॉ. पी.एच. गौरखेडे, डॉ. शशिशेखर जावळे, डॉ. स्नेहल शिलेवंत आदींनी परिश्रम केले.