Wednesday, August 12, 2020

भारतीय कृषिविद्या सोसायटीवर महाराष्ट्र राज्याचे समन्वयक म्हणुन डॉ. बि. व्ही. आसेवार यांची निवड

भारतीय कृषि संशोधन परिषदच्या अतंर्गत असलेल्या नवी दिल्ली येथील भारतीय कृषि संशोधन संस्थेच्‍या कृषिविद्या विभागातर्फे चालविण्यात येणा­या भारतीय कृषिविद्या सोसायटीवर महाराष्ट्र राज्याचे समन्वयक म्हणुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषिविद्या विभागाचे विभाग प्रमुख डॉ. बि. व्ही. आसेवार यांची निवड झाली आहे. सदरील निवड ही सन २०२० - २०२१ या दोन वर्षासाठी झाली असुन सदरील सोसायटीची स्थापना माजी केंद्रिय कृषिमंत्री स्‍व डॉ. पंजाबराव देशमुख यांनी सन १९५५ मध्ये केली होती.