वनामकृवित स्व. वसंतराव नाईक यांची जयंती साजरी
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरितक्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांची जयंती दिनांक १ जुलै रोजी कृषिदिन म्हणुन साजरी करण्यात आली. विद्यापीठातील स्व. वसंतराव नाईक यांच्या स्मारकाचे कुलगुरू मा डॉ प्रमोद येवले यांच्या हस्ते पुजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास माननीय कुलगुरू यांच्या सुविद्य पत्नी मा श्रीमती ज्योतीताई येवले, कुलसचिव डॉ धीरजकुमार कदम, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, विद्यापीठ नियंत्रक श्रीमती दिपाराणी देवतराज, प्राचार्य डॉ सय्यद ईस्माईल, प्राचार्य डॉ उदय खोडके, प्राचार्य डॉ गिरीधर वाघमारे, प्राचार्या डॉ जया बंगाळे, सहयोगी अधिष्ठाता (निम्न शिक्षण) डॉ गजेंद्र लोंढे आदींसह विविध विभागाचे विभाग प्रमुख, विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी विद्यापीठ परिसरात विविध महाविद्यालय आणि विभागात कुलगुरू मा डॉ प्रमोद येवले आणि त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती ज्योतीताई येवले यांच्या हस्ते वृक्षलागवड करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि राष्ट्रीय छात्रसेनेच छात्रसैनिक यांनी परिश्रम घेतले.