वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयातील विस्तार शिक्षण विभागाच्या पदव्युत्तर विद्यार्थींनी कृषि दिनानिमित्त संपादीत केलेले कृषि संवाद भितीपत्रकाचे विमोचन दिनांक १ जुलै रोजी प्राचार्य डॉ सय्यद ईस्माईल यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विभाग प्रमुख डॉ राजेश कदम, डॉ एस आर जक्कावाड, डॉ प्रविण कापसे, डॉ एम आय खळगे, डॉ अनुराधा लाड, प्रा. आर सी सावंत आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शनात डॉ सय्यद ईस्माईल म्हणाले की, भितीपत्रक लिखाणामुळे विद्यार्थ्यांमध्ये लिखानातील सर्जनशीलतेस वाव मिळतो. सदरिल भितीपत्रक विभाग प्रमुख डॉ राजेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील पदव्युत्तर विद्यार्थी स्वप्नाली अभंग, शुश्रृत अल्लेटी, रेणुका बांगर, विशाल बिरादार, वैभव डुकरे, धनेश्वरी गोहाडे, अभिषेक हिवराळे, ऋतुजा जाधव, रोहीता जेट्टी, स्वाती महाजन, शुभम मेश्राम, सीपाना अनिलकुमार, निलेश वैद्य, वर्षीता रेड्डी आदींनी संपादीत केले असुन सदरिल भितीपत्रक हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या कार्यावर आधारित आहे.