वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयात दिनांक २७ जुलै रोजी नांदेड येथील मे. अंम्बीशन फर्टिलायझर कंपनीच्या वतीने परिसर मुलाखती घेण्यात आल्या. यात महाविद्यालयाच्या ३८ पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी मुलाखती दिल्या, यातील २२ विद्यार्थ्यांची कंपनीव्दारे विपणन, संशोधन व विकास विभागात विविध पदाकरिता निवड करण्यात आली. परिसर मुलाखती करिता प्राचार्य डॉ सय्यद ईस्माईल यांच्या मार्गदर्शनाखाली प्लेसमेंट सेलचे प्रभारी डॉ पी आर झंवर, शिक्षण विभागचे प्रभारी डॉ रणजित चव्हाण, डॉ एस आर जक्कावाड, डॉ सुरेश वाईकर, डॉ मिलिंद सोनकांबळे, डॉ प्रविण कापसे आदींनी कार्य केले. तर कंपनीच्या वतीने श्री शिवप्रसाद धानोरकर सह संचालक सदस्यांनी मुलाखती घेतल्या.