नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या केंद्रीय वाण प्रसारण उपसमिमीची बैठक दिनांक १७ जून रोजी उपमहासंचालक (पिकशास्त्र) डॉ. टि. आर. शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, या बैठकीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या तीन पिकांच्या वाणास मान्यता देण्यात आली. यात विद्यापीठ विकसित करडई पिकांच्या पीबीएनएस १८४, देशी कापसाच्या पीए ८३७ तसेच खरीप ज्वारीच्या परभणी शक्ती वाणास मान्यता प्राप्त झाली. सदरिल वाणा मान्यतेबाबतचे पत्र नुकतेच देशाच्या कृषि आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाकडुन विद्यापीठास प्राप्त झाले, अशी माहिती संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर यांनी दिली.
या वाणातील करडई पिकांच्या पीबीएनएस १८४ वाणास महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडु आदी राज्याकरिता तर देशी कापसाच्या पीए ८३७ या वाणाची आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यात लागवडीसाठी प्रसारण करण्याची मान्यता देण्यात आली तसेच खरीप ज्वारीच्या परभणी शक्ती वाणास महाराष्ट्र राज्यात प्रसारणाची मान्यता प्राप्त झाली. हे वाण केंद्रीय वाण प्रसारण उपसमितीनी प्रसारित केल्यामुळे सदरील वाणांचे बीजोत्पादन हे बीजोत्पादन साखळीमध्ये घेता येते असुन आणि या वाणांचा प्रचार व प्रसार महाराष्ट्रासह बाहेरील राज्यात मोठया प्रमाणावर होण्यास मदत होणार आहे.
तीन वाणाची थोडक्यात
माहिती
खरीप ज्वारी मध्ये परभणी शक्ती (पीव्हीके १००९)
हा वाण महाराष्ट्र राज्यासाठी प्रसारित करण्यात आला आहे.
देशातील पहिला जैवसंपृक्त वाण म्हणुन परभणी शक्ती या वाणास या अगोदरच महाराष्ट्र
राज्य वाण प्रसारण समितीने मान्यता दिली आहे. परभणी शक्ती वाणामध्ये धान्यात प्रती किलो ४२ मि. ग्रॅम लोहाचे प्रमाण असुन २५ मि. ग्रॅम जस्ताचे प्रमाण असुन वाणापेक्षा अधिक आहे.
करडई पिकाचा पीबीएनस १८४ या वाणाचे उत्पादन हेक्टरी १५३१ किलो एवढे असुन यात तेलाचे प्रमाण ३१.३ टक्के एवढे आहे. या वाणास पक्व होण्याचा कालावधी १२० ते १२३ दिवस एवढा आहे. तसेच देशी कापुस वाण पीअे ८३७ कापसाचे उत्पादन हेक्टरी १५ ते १६ Ïक्वटल असुन धाग्याची लांबी २८ मिली मिटर एवढी आहे. या वाणाचा कालावधी १५० ते १६० दिवस आहे. हा वाण रसशोषक किडी व दहीया रोगास सहनशील आहे.