वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील परभणी कृषी महाविद्यालय आणि रेशीम संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण जागरूकता कार्यक्रम अंतर्गत कृषीदिना निमित्त मौजे मंगरूळ (ता मानवत) वृक्षलागवड आणि वृक्ष दिंडी संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच जमीर पठाण हे होते
तर मुख्याध्यापक श्री मोरे आदीसह शाळेतील शिक्षक वर्ग उपस्थित होते. कृषीकन्यांनी
पर्यावरण संतुलनात झाडांचे महत्व यां विषयी विध्यार्थ्यांना माहीती दिली. गावामुध्ये
वृक्ष दिंडी काढुन झाडे लावा झाडे जगवा व पर्यावरणाचे ठेवा भान तेव्हाच बनेल देश
महान असा संदेश देण्यात आला.
सदर रावे कार्यक्रम प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल, रावे समन्वयक डॉ.
राजेश कदम, रेशीम संशोधन योजनेचे प्रमुख डॉ. चंद्रकात लटपटे, सहसम्न्वयक डॉ प्रविण
कापसे, कार्यक्रम अधिकारी डॉ. विक्रम घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृषिकन्या डी.डी माने, वी एन लोंढे, के जी पन्नमवाड, बी.म.माने, पी. ए मोकाशे, टी टी मुनघाटे, पी. के. मगर, पी. एस मगर, बी बी माने, जे. पी. मोरे, वी.एम नखाते, पी. एम. पदमगीरवार, एच. वी पांगरेकर, एच एस पवार आदींनी
परिश्रम घेतले, कार्यक्रमाकरिता विद्यार्थी व शिक्षकांनी सहकार्य
केले.