वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि कीटकशास्त्र विभाग व कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ५ जुलै रोजी पिकावरील कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) २०२२-२३ अंतर्गत लातुर विभागातील कृषि विभागातील अधिका-यांसाठी एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले हे होते तर संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, लातुर विभागीय कृषि सहसंचालक श्री. साहेबराव दिवेकर, प्राचार्य डॉ. सय्यद ईस्माईल, प्राचार्य डॉ. संजीव बंटेवाड, विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, क्रॉपसॅप समन्वयक डॉ. अनंत लाड, लातुर विभागातील सर्व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. विजय लोखंडे (परभणी), श्री. आर बी चलवदे (नांदेड), श्री. महेश तीर्थंकर (उस्मानाबाद), श्री. दत्तात्रय गावसाने (लातूर), श्री. एस. ए. घोरपडे (हिंगोली) आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात डॉ. धर्मराज गोखले यांनी म्हणाले की, क्रॉपसॅप प्रकल्पाच्या माध्यमातून अचुक सर्वेक्षणामुळे किडींची आर्थिक नुकसान पातळीची माहिती झाल्याने शेतकरी बांधवाना योग्य वेळी किडींचे व्यवस्थापन शक्य होत आहे. कृषि विभागातील अधिका-यांनी किडींचे अचुक सर्वेक्षण करण्याचा सल्ला त्यांनी दिला.
श्री. साहेबराव दिवेकर यांनी मराठवाडयात कापुस, सोयाबीन, ज्वारी ही महत्वाची पिक असुन यावर येणा-या किडींचे व्यवस्थापनाचा सल्ला प्रसारमाध्यमातून वेळोवेळी देण्यात यावा जेणे करुन शेतक-यांचे होणारे नुकसान टाळेल. डॉ. सय्यद ईस्माईल हे क्रॉपसॅप प्रकल्पाच्या माध्यमातून किड-रोग सर्वेक्षणाचा शेतकरी बांधवा होत असल्याचे म्हणाले. तर डॉ. संजीव बंटेवाड यांनी क्रॉपसॅप प्रकल्पातील जिल्हा समन्वयकांनी कृषि विभागाच्या सहयोगाने वेळोवेळी प्रक्षेत्र भेटी दयावी. प्रकल्पाच्या माध्यमामुळे कापसावरील गुलाबी बोंडअळी, मक्यावरील लष्करी अळीचे योग्यरित्या व्यवस्थापन करण्यास मदत झाली असल्याचे म्हणाले. मनोगतात श्री. आर बी चलवदे विद्यापीठाच्या सल्याने योग्य किटकनाशकांची शिफारस शेतकरी बांधवापर्यंत त्वरित गेली पाहिजे असे मत व्यक्त केले.
तांत्रिक सत्रात सोयाबीनचे लागवड तंत्रज्ञानावर डॉ. शिवाजी म्हेत्रे यांनी मार्गदर्शन केले तर कापुस लागवडीवर डॉ. अरविंद पांडागळे, कपाशीवरील किडींचे व्यवस्थापनावर डॉ. बस्वराज भेदे, क्रॉपसॅप प्रपत्र भरणे यावर डॉ. अनंत लाड, उस, मका, ज्वारी पिकावरील किडींचे व्यवस्थापनावर डॉ. दिगंबर पटाईत, हवामानाचा अंदाज आधारीत पिक व्यवस्थापनावर डॉ. कैलास डाखोरे, किडींची अतिउद्रेकाची ठिकाणे आणि मागील हंगामातील आढावा यावर डॉ. संजीव बंटेवाड, पिक रोग व्यवस्थापनावर डॉ. विक्रम घोळवे, शेतीतील मित्रकिटक यावर डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, कीटकनाशकांचा सुरक्षित वापर यावर डॉ. पुरुषोत्तम झंवर, सोयाबीन वरील किड व्यवस्थापन यावर डॉ. राजेंद्र जाधव आदींनी मागदर्शन केले.
प्रास्ताविकात विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी केले. सुत्रसंचलन डॉ. अनंत लाड यांनी केले तर आभार श्री. जगताप यांनी मानले. कार्यशाळेस लातुर विभागातील उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी आदीसह लातुर विभागातील १५० अधिकारी उपस्थित होते. कार्यशाळा यशस्वीतेकरिता कीटकशास्त्र विभागाचे डॉ. गोसलवाड, डॉ. चंद्रकांत लटपटे, डॉ. मिलिंद सोनकांबळे, डॉ. धुरगुडे, डॉ. जायेवार, डॉ. राजरतन खंदारे, डॉ. संजोग बोकन, श्री. धनंजय मोहोड, अनुराग खंडारे, दिपक लाड, योगेश विश्वांभरे, सुरेश शिंदे, सोपान ढगे आदींनी सहकार्य केले.