Wednesday, July 13, 2022

शेतातील पैसा किडीचे कसे कराल व्‍यवस्‍थापन

मिलीपीड (पैसा) किडीबाबत ओळख व व्यवस्थापन

मिलीपीड म्‍हणजेचे आपण त्‍यास पैसा म्‍हणतो जगभरात याच्‍या १२००० पेक्षा अधिक प्रजाती असुन पैसा हा सहसा जिथे पाउस जास्त पडतो तेथे ओलसर, जंगले, दगडाच्या खाली, मातीमध्ये आदी भागात आढळतात (गवत, पाने, कचरा, कंपोष्ट). काही प्रजाती पुरग्रस्त भागात टिकू शकतात व दोन महीन्यापर्यंत पाण्यात बुडतात. मिलीपीड (पैसा) फार वेगवान हालचाल करु शकत नाहीत आणि बहूतेक प्रजाती सडणा-या वनस्पती सामग्रीवर जगतात. मिलीपीडमध्ये विषारी स्टिनर नसतात परंतू त्यापैकी काही शरीरातल्या छिद्रामधून दुर्गंधीयुक्त रसायने तयार करतात, ही रसायने अनेक भक्षकांना दुर ठेवण्यास मदत करतात. बहुतेकदा सेंटीपीड, कोळी, बेडूक, भक्षक पक्षी कीटकांनी खाल्ले जातात. धोक्याच्या वेळी मिलीपीड मऊ असणा-या शरिराच्या खालच्या बाजुचे संरक्षण करताना कडक असलेल्या वलय उघडीस करून त्याच्या शरीरात घट्ट आवर्त वर्तुळ करतात. मिलीपीड बहुतेकदा रात्री नैसर्गीक स्थान सोडतात, आणि पायाच्या साहयाने रेंगाळत वर्षाच्या विशिष्ट विशेषत: शरद ऋतू दरम्यान ते मोठया संख्येने स्थलांतर करू शकतात. वसंत आणि ग्रीष्म ऋतु मध्ये जास्त ओल्या किंवा कोरडया हवामानाच्या अनुषंगाने स्थलांतरीत करतात.

नुकसान : मिलीपीडस हया निशाचर असुन (Nocturnal habit) सामान्यता सडणारी पाने, सडलेले लाकूड आणि इतर प्रकारच्या ओलसर, किडणा-या वनस्पती पदार्थांना खातात. साधारणपणे त्यांची भुमिका कुजलेल्या झाडाचे विघटन करण्यास मदत करणारा आहे. तथापी जेव्हा ते असंख्य होतात तेव्हा ते जमिनीवर संपर्कात येणा-या रोपटे, बियाणे रोपे जसे कापुस, सोयाबिन या सारख्या पिकाचे नुकसान करतात. जमिनीलगत रोपे कापुन टाकतात कालांतराने रोपावर जाउन पाने कुरतडतात. कधी कधी मिलीपीडस आपल्या ओलसर राहणा-या ठिकाणामधून घरात फिरतात परंतु कोरडया परिस्थितीमुळे व अन्न अभावी ते सहसा द्रुत गतीने मरतात. कधी कधी मोठया संख्येने मिलीपीड स्थलांतर करतात. ब-याचदा अन्न पुरवठा कमी होउन किंवा त्यांची राहण्याची जागा एकतर ओली किंवा कोरडी होउन ते बाहेर पडतात व पाण्यात पडतात आणि बुडतात.

व्यवस्थापन : मिलीपीडचा कमी करण्यासाठी प्रभावी दिर्घ मुदतीचा उपाय म्हणजे आर्द्रता आणि लपण्याची ठिकाणे कमी करणे विशेषत: गवत कापने, ओले गवत, दगड, जमिनीवर ठेवलेल्या वस्तू, बांधावरील गवत इ. काढले पाहीजे. ब-याचदा आर्द्र, घनदाट पिकात जास्त पाणी देणे किंवा संध्याकाळी पिकात पाणी चालू ठेवल्यास मिलीपीडच्या समस्यास कारणीभुत ठरु शकतात. कीड लपण्याच्या जागा म्‍हणजेचे शेतातील पडलेला पालापाचोळा किंवा वाळलेले कुजलेले पदार्थ गोळा करुन नष्ट करावेत. पैसा रात्री जास्त सक्रीय असल्या कारणाने शेतक-यांनी रात्रीच्या वेळी शेतात गवताचे ढिग करुन ठेवावेत आणि सकाळी गवताच्या ढिगाखाली जमा झालेले पैसा जमा करून मिठाच्या द्रावणात टाकावे. शेतातील ओले गवत आणि इतर सेंद्रिय पदार्थ कमी करा व जास्त आर्द्रता टाळा. जास्त आर्द्रता व अन्नाचा पुरवठा नसल्यास संरचनामध्ये प्रवेश केल्याच्या काही दिवसातच मिलीपीडस मरतात. जेथे पेरणी अगोदर शेतक-यांनी बिजप्रक्रीया केली असल्यास तेथे प्रादुर्भाव कमी आढळून आलेला आहे. शेतात व बांधावरील पैसा किड हाताने वेचुन त्या साबणाच्या पाण्यात बुडवून माराव्यात. शेत तणविरहीत ठेवावे व शेतातील बांधावरील तणाचे व्यवस्थापन करावे. पिकामध्ये वेळेवर कोळपणी करावी त्यामुळे जमिनीतील अंडी व लपून बसलेल्या पैसा किडी उघडया पडून नष्ट होतील. चांगला पाउस पडल्यास या किडींचे नैसर्गीक नियंत्रण होते. किड संपूर्ण शेतात पसरलेली असल्यास क्लोरोपायरीफॉस २० ईसी ३ मिली किंवा क्लोरोपायरीफॉस ५० टक्के + सायपरमेथ्रीन ५ टक्के एसपी १.५ मिली प्रति लीटर या प्रमाणे फवारणी करावी. सद‍र कीटकनाशकाची शिफारस मिलीपेड साठी नाही, मात्र कापूस पिकामध्ये आहे. तसेच कार्बोसल्फोन (६ टक्के दानेदार) किंवा क्लोरोपायरीफॉस (१० टक्के दानेदार) किंवा फिप्रोनिल (०.३ टक्के) ५ किलो प्रति १०० किलो शेणखतात मिसळून ओळीने शेतातील रोपा जवळ वापरावे. सदरील कीटकनाशके परिणामकारक आहेत परंतु लेबल क्लेम नाहीत. शेतकरी बांधवांनी पैसाचा प्रादुर्भाव टाळण्‍यासाठी वरील प्रमाणे उपाययोजना करण्‍याचा सल्‍ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि किटकशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. पुरोषत्तम नेहरकर, डॉ. अनंत लाड, डॉ. राजरतन खंदारे यांनी केले आहे.


पैसा किडी बाबत अधिक जाणुन घ्‍या पुुुढे क्लिक करा


पैसा किडी बाबत अधिक जाणुन घ्‍या

ओळख : मिलीपीड यास हजार लेगर्स असेही म्हटले जाते, आपल्या भागात Eurymerodesmus spp. या जातीच्‍या मिलीपीड आढळतात. तपकिरी, काळपट रंगाचे असून प्रत्येक शरिराच्या भागाचे दोन किंवा चार पाय असतात. मिलीपीडजवळ खरोखरच हजार पाय नसतात. प्रजातीवर अवलंबून त्याचे पाय ४७ ते १९७ जोडयाचे असतात तर सर्वात जास्त ७५० पाय आहेत. जवळजवळ शरिराचे २५-१०० भाग सेगमेंट (segments) असतात. शरिराचे डोके आणि इतर शरिर असे दोन भागात विभाजन होते. प्रौढ मिलीपीडची लांबी अर्धा ते साडे सहा इंच असते. जेव्हा आपण स्पर्श करतो किंवा विश्रांती घेते तेव्हा बहुतेक मिलीपीड अंग चोरून घेतात (गोळा होतात - कर्लअप करतात) तेव्हा त्यास आपल्या भागात पैसा असे म्हणतात. मिलीपीड एक बाहय कवचाने यांच्या  कठोर आच्छादनाने झाकलेले (Exoskeleton) असतात. त्यांच्याकडे दृष्टी कमी असल्याने अँटीनाच्या साहयाने आजुबाजूच्या परिस्थीतीची जाणीव करण्यात मदत करतात. तुलनेने अल्प आयुष्यासह इतर अर्थोपोड (Arthropod) पेक्षा मिलीपीड ७ ते १० वर्षाच्या दरम्यान जगू शकतात.

जीवनक्रम : जन्माच्या वेळी मिलीपीडसच्या शरिराचे ६ भाग असतात आणि पायाचे ३ जोडया असतात. जेव्हा कात टाकतात त्यावेळी शरीराचे भाग  आणि पाय संख्या वाढतात. नर मिलीपीडसला ७ व्या भागाला पाय नसतात त्या ठिकाणी जननेंद्रिये (Modified legs) असतात तर मादी जननेंद्रिये मिलीपीडसच्या दुस-या पायाच्या जोडीजवळ असते. समागमा नंतर मादी मिलीपीडस २०-३० अंडी उबदार मातीत देतात. त्यांना सुरक्षित वेष्टनाव्दारे झाकतात. अंडयामधून अळी बाहेर पडते तेव्हा पाय नसतात जेव्हा पहीली असस्था असते तेव्हा पाय फुटतात अशा प्रकारे प्रत्येक अवस्थे वेळी पाय फुटतात व शरिराची लांबी कप्याने वाढतात. जास्तीत जास्त दोन ते १२ इंच पर्यंत वाढ होते आणि ७ ते १० वर्ष पर्यंत जगतात.