वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि महाविद्यालयाच्या विस्तार शिक्षण विभागाच्या वतीने दिनांक १३ जुलै रोजी गुरू पौर्णिमा साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभाग प्रमुख डॉ राजेश कदम होते तर डॉ एस आर जक्कावाड, डॉ पी एस कापसे, डॉ एम आय खळगे, डॉ एस आर पुरी, डॉ आर सी सावंत, डॉ विद्याधर मनवर, डॉ अनुराधा लाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शनात डॉ राजेश कदम म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून मार्गक्रमण करावे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासात गुरूची मोठी भुमिका असते. यावेळी पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी संपादीत केलेल्या गुरू संवाद भितीपत्रकाचे विमोचन करण्यात आले. विभागातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी उपस्थित गुरूजनांचा सत्कार करून त्यांच्य प्रती आदर व्यक्त केला. कार्यक्रमात डा विद्यार्थींनी वैभव डुकरे व संगिता हुलमुखे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन घाणेश्वरी गोहाडे व रेणुका बांगर यांनी केले तर आभार संतोष शेंडे यांनी मानले. कार्यक्रमात विभागातील पदव्युत्तर विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.