Saturday, February 19, 2022

वनामकृवित छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्‍साहात साजरी

छत्रपती शिवाजी महाराजानी सर्व जातीधर्मातील माणसांना सोबत घेऊन स्‍वराज्‍य स्‍थापन केले. प्रत्‍येकांनी शिवचरित्राचे वाचन करावे, छत्रपतींनी स्‍वराज्‍यासाठी आखलेली धोरणे, प्रशासन, युध्‍दनिती, शेतक-यांच्‍या कल्‍याणासाठी केलेले कार्य आजही प्रेरणादायी आहे. शिवचरित्र आपणास संकटाशी सामना करण्‍याची शिकवण देते, असे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण यांनी  केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी कार्यालयाच्‍या वतीने दिनांक १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जंयती साजरी करण्‍यात आली, कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानावरून ते बोलत होते तर व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माइल, प्राचार्य डॉ उदय खोडके, प्राचार्या डॉ जया बंगाळे, कुलसचिव डॉ धीरजकुमार कदम, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या प्रतिमेचे पुजन करून विनम्र अभिवादन करण्‍यात आलेयावेळी ढोल ताशाच्‍या गजरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या मुर्तीची विद्यापीठ परिसरात मिरवणुक काढण्‍यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तुषार शेळके यांनी केले तर आभार पपीत पुंडे यांनी मानलेकार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.