राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञानवारी कार्यक्रमास शालेय विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद
वनामकृवि
आणि परभणी अस्ट्रोनोमिकल सोसायटी यांचा संयुक्त उपक्रम
देशाच्या
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे सुवर्ण
महोत्सवी वर्षाचे औजित्य साधुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि परभणी अस्ट्रोनोमिकल
सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विज्ञान दिना निमित्त विज्ञानवारीचे २०२२
चे आयोजन करण्यात आले होते, यावेळी आयोजित कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणुन त्या बोलत
होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते तर स्वागताध्यक्ष
म्हणुन परभणी विधानसभेचे माननीय आमदार मा डॉ राहुल पाटील हे उपस्थित होते. व्यासपीठावर जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा श्री शिवानंद टाकसाळे, शिक्षण संचालक
डॉ धर्मराज गोखले, परभणी अॅस्ट्रोनॉमीकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ रामेश्वर नाईक, उपाध्यक्ष
पी आर पाटील, शिक्षणाधिकारी श्रीमती आशाताई गरूड, सचिव सुधीर सोनूनकर, प्रा सुनिल
मोडक आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आपल्या भाषणात आमदार मा
डॉ राहुल पाटील म्हणाले की, परभणी कृषि विद्यापीठ व अस्ट्रोनोमिकल सोसायटी वतीने उभारण्यात येणा-या विज्ञान संकुल करिता राज्य शासनाने
अकरा कोटी रूपयाचा निधी उपलब्ध करून दिला आहे, या विज्ञान संकुलामुळे शालेय विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय
दर्जाचे व्यासपीठ उपलब्ध होणार होऊन त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टीकोन
विकसित होईल, त्यांच्यातुन आंतरराष्ट्रीय र्कितीचे शास्त्रज्ञ घडतील.
हे विज्ञान संकुल उभारण्यात समाजातील प्रत्येक घटकांनी आपले योगदान दिले पाहिजे.
परभणी शहर हे शिक्षणाचे हब होण्याकरिता आपण प्रयत्नशील असुन परभणी जिल्हयात भविष्यात
तीन ते चार विद्यापीठ निर्माण करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
अध्यक्षीय समारोपात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्हणाले की, कृषि विद्यापीठात उभारण्यात येणारे विज्ञान संकुलामुळे मराठवाडयातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित होण्यास मदत होईल, यातुनच जागतिक दर्जेाचे शास्त्रज्ञ घडतील. औंढ नागनाथ परिसरात गुरूत्व लहरीचा अभ्यास करणारी जागतिक किर्तीची नासानंतरचे तिस-या क्रमांकाची लिगो नावाची प्रयोगशाळेची उभारणी होत आहे. सदरिल प्रयोगशाळेत आपल्याही विद्यार्थ्याना संधी प्राप्त होऊ शकेल. प्रत्येक वर्षी राष्ट्रीय विज्ञान दिनी शालेय विद्यार्थ्यांकरिता विज्ञान प्रदर्शन विद्यापीठात भरविण्यात येईल, असेही ते म्हणाले.
जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा श्री शिवानंद टाकसाळे आणि शिक्षण संचालक डॉ धर्मराज
गोखले यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात अमेरिकेच्या राष्ट्रीय आंतरीक्ष संस्थेचे
अंतरीक्ष राजदूत श्री अविनाश शिरोडे
यांनी ऑनलाईन माध्यमातुन संवाद साधला. प्रास्ताविकात डॉ रामेश्वर नाईक यांनी विज्ञानवारीची
भुमिका मांडली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालक प्रा. नितिन लोहट यांनी केले तर आभार प्रा
रणजित लाड यांनी मानले.
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विद्यापीठाच्या नाहेप प्रकल्पाच्या परिसरात विविध कार्यक्रम व विभागीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यात तांबट पक्षा विषयी व जैवविविधता माहितीपट दाखविण्यात आला तसेच प्रकाशाच्या वर्णपट, थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञान यांत्रिक कलम संयंत्र, वसंतराव नाईक सभागृह कृषी विज्ञान विषयक चित्रफिती, ताऱ्यांचे विश्व, रोबोटिक्स, ड्रोन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डोम प्लॅनेटोरियम शो (तारांगण), शालेय विद्यार्थ्यांचे विज्ञान प्रदर्शन, चला शिकूया प्रयोगातून विज्ञान, कृषी प्रदर्शन, डे टाईम ॲस्ट्रॉनॉमी गणित आणि विज्ञान साहित्य, अंधश्रद्धा निर्मुलन दालन, संवाद शास्त्रज्ञांशी कार्यक्रम, चालता बोलता प्रश्न मंजुषा आदी विविध उपक्रम राबविण्यात आले. विज्ञान प्रदर्शनीत शालेय विद्यार्थांनी विविध विज्ञान विषयक प्रयोगाचे सादरीकरण केले, यातील उत्कृष्ट प्रयोग सादर करणा-या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. मान्यवरांच्या उपस्थित शालेय विद्यार्थ्यांनी कृत्रिम उपगृह प्रक्षेपणाचे प्रात्यक्षिक दाखविले. सदरिल उपक्रमास मराठवाडयातील शालेय विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.