वनामकृविच्या वतीने आयोजित सेंद्रीय शेती प्रशिक्षणात प्रतिपादन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्या वतीने 30 दिवसीय राज्यस्तरीय सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचे ऑनलाईन वेबीनारच्या माध्यमातुन दि. 15 फेब्रुवारी ते 31 मार्च दरम्यान आयोजन करण्यात आले असुन दिनांक 16 फेब्रुवारी रोजी “ओळख : सेंद्रीय शेतीची” या विषयावरील नागपुर येथील प्रादेशिक जैविक शेती केंद्राचे प्रादेशिक संचालक डॉ. अजय सिंह राजपूत यांच्या व्याख्यान संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रायचुर (कर्नाटक) येथील कृषि विज्ञान विद्यापीठाचे अधिष्ठाता (कृषि) डॉ. सुरेश पाटील, प्रगतशील शेतकरी श्री. सुधाकर कुबडे, आयोजक प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे, विभाग प्रमुख डॉ. स्मिता खोडके आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शनात प्रमुख वक्ते डॉ. अजय सिंह राजपूत म्हणाले की, सेंद्रीय शेती ही एक व्यापक संकल्पना आहे. जमीन जीवंत असणे, त्यामध्ये जिवाणुंची संख्या अधिक असणे, हा सेंद्रीय शेतीचा आत्मा आहे. सेंद्रीय शेती सुरुवात करतांना थोडया क्षेत्रावर करुन हळुहळु वाढवीले पाहिजे. पर्यावरणीय तत्व व आरोग्याचे तत्व ही सेंद्रीय शेतीची मुलभुत तत्वे असून सेंद्रीय शेती यशस्वी करण्यासाठी सेंद्रीय सेंद्रीय शेतीची संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे. सेंद्रीय शेतीसाठी लागणाया निविष्ठा कमी खर्चात तयार करणे गरजेचे आहे. शेणखत, गांडुळखत, दशपर्णी अर्क, निमअर्क व गोमुत्राचाही वापर अधिक उपयुक्त आहे. महाराष्ट्रातील शेतकयांनी सेंद्रीय पीक उत्पादन करून स्वत: ब्रड निर्माण करावा. जगात सेंद्रीय शेती करणाया शेतकयांची सर्वाधीक संख्या ही भारतामध्ये असुन सेंद्रीय प्रमाणीकरण करुन याचे संधीमधे रुपांतर करणे आवश्यक आहे.
अध्यक्षीय भाषणात अधिष्ठाता डॉ. सुरेश पाटील म्हणाले की, महाराष्ट्र राज्यात सेंद्रीय शेतीसाठी खुप मोठी संधी असुन राज्यातील लोक मानवी आरोग्याबाबत जागरुक झाले आहेत. सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राने आयोजित केलेले सेंद्रीय शेतीवरील प्रशिक्षण हा एक ज्ञानयज्ञ असून ही अभिनंदनीय बाब आहे.
प्रगतशील शेतकरी श्री. सुधाकर कुबडे, रा. सेलु, ता. कळंबेश्वर, जि. नागपुर यांनीही आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, सेंद्रीय शेती करतांना सातत्य व चिकाटी गरजेची असुन योग्य तंत्रज्ञानाचा वापर करुन सेंद्रीय शेतीमध्ये अधिक अत्पादन घेता येते. त्यांचा स्वत:चा सेंद्रीय संत्रा हा दिल्ली, मुंबई येथे चांगल्या बाजार भावाने विक्री करण्यास यश आल्याचे त्यांनी सांगितले.
सदरिल प्रशिक्षणाचे आयोजन शेतकरी बंधु भगिनी, कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ, कृषि शास्त्रज्ञ, विद्यार्थी, कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी व स्वयंसेवी संस्थांचे सदस्य यांच्या करिता कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण व संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. प्रशिक्षण कार्यक्रमाचा दोन हजार पेक्षा जास्त शेतकरी बंधू भगिनी तसेच विद्यार्थी, कृषि शास्त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ यांनी लाभ घेतला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. प्रितम भुतडा यांनी तर आभार डॉ. श्रद्धा धुरगुडे यांनी म्हणाले तसेच डॉ. मिनाक्षी पाटील यांनी संकलक म्हणुन काम पाहिले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. अनुराधा लाड, डॉ. संतोष बोरगावकर, डॉ. पपीता गौरखेडे, अभिजीत कदम, दिपक शिंदे, इंजि. अपुर्वा देशमुख, अनिकेत वाईकर, सतीश कटारे, योगेश थोरवट आदींनी परिश्रम घेतले.