परभणी: वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत संकरीत गो पैदास प्रकल्प (बलसा डेअरी) येथे संकरीत देवणी आणि होलदेव जातीच्या संकरीत जनावरांचा (गाय, कालवडी, गो-हे व वळू) जाहीर लिलाव व विक्रीचे आयोजन बुधवार दिनांक 16 फेबुवारी रोजी सकाळी 11.00 वाजता करण्यात आले आहे.
संकरीत गो-पैदास प्रकल्पाची स्थापना सन 1975 साली झालेली असुन मराठवाडा विभागासाठी जातीवंत देवणी व होलदेव जनावरांचे मोठया प्रमाणावर निर्मिती करून संवर्धन व संगोपन केल्या जाते. देवणी ही महाराष्ट्रातील एकमेव बहुउद्देशीय जात असुन उत्तम व्यवस्थापनाव्दारे 5 ते 6 लिटर दुध देण्याची क्षमता आहे. प्रकल्पावर शेतकरी व गोपालक मोठया प्रमाणात भेटी देण्यासाठी येत असतात. मराठवाडयासह संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकयांना व गोपालकांना जातीवंत पशुधनांचे महत्व समजावे, तसेच यापासुन त्यांच्या शेती व्यवसायात आर्थिक स्थैर्य मिळावे या हेतूने दरवर्षी प्रकल्पाव्दारे जातीवंत पशुधनांचा जाहीर लिलाव व विक्री आयोजित करण्यात येते. तरी महाराष्ट्रातील शेतकरी व गोपालक यांनी दि. 16 फेब्रुवारी रोजी होणाया जाहीर लिलावामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन संकरीत गो पैदास प्रकल्पाचे जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. डी. एस. चौहाण, वनामकृवि., परभणी यांनी केले आहे.