परभणी आत्मा (कृषी विभाग) आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील रेशीम संशोधन योजना यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ४ फेब्रुवारी रोजी मौजे आलेगांव ता पुर्णा येथे तुती रेशीम उद्योग प्रात्यक्षिक व प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री. विश्वनाथ सवराते हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन कृषिभुषण व उद्यानपंडीत श्री. आर.पी.कदम हे होते, मुख्य मार्गदर्शक रेशीम संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ चंद्रकांत लटपटे, पुर्णा तालूका कृषि अधिकारी श्री. रामचंद्र तांबीले, जिल्हा रेशीम विकास अधिकारी श्री. गोविंद कदम, केंद्रिय रेशीम बोर्डचे शास्त्रज्ञ श्री.ए.एल.जाधव, कृषि सहाय्यक श्री.डी.एस.तिडके, उद्यानपंडीत श्री.भानुदास सवराते आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शनात डॉ. चंद्रकांत लटपटे यांनी कमी खर्चात तुती रोपवाटीका तयार करण्याबददल माहिती देऊन प्रत्यक्ष तुती छाटणीचे प्रात्यक्षिक शेतकयांना दाखवले तसेच तुती फळापासून व पानापासून विविध पदार्थ तयार करण्याबददल माहिती दिली. श्री. रामचंद्र तांबीले यांनी शेतकरी गट स्थापना करून नानासाहेब कृषि संजिवनी योजना (पोक्रा) अंतर्गत विविध शेती विषयक योजनेचे लाभ घेण्याचे आवाहन केले तर रेशीम शेतीसाठी विविध शासकिय योजने बददल श्री.गोविंद कदम यांनी माहिती दिली.
सुत्रसंचालन वरिष्ठ संशोधन सहाय्यक श्री. धनंजय मोहोड यांनी केले तर आभार बीटीएम आत्मा श्री. व्हि. सी. जोशी यांनी मानले. कार्यक्रमास साठ पेक्षा जास्त शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाइी श्री. विश्वनाथ सवराते, दत्ता सवराते आदीसह गावातील शेतकरी बांधवांनी परीश्रम घेतले.