वनामकृवित फाळणी शोकांतिक स्मृती दिवसानिमित्त छायाचित्र प्रदर्शनीचे उदघाटन
देशाची फाळणी दिनांक १४ ऑगस्ट १९४७ रोजी झाली, ही फाळणी भारतीय नागरिकाकरिता अतिशय वेदनादायी होती, त्याची माहिती महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देश्याने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत असलेल्या विविध महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातुन फाळणी शोकांतिक स्मृती दिवसानिमित्त (विभाजन विभिषिका स्मृृृती दिन) दिनांक १० ऑगस्ट ते १४ ऑगस्ट दरम्यान फाळणी प्रसंगीचे छायाचित्रांच्या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले असुन परभणी कृषि महावि़ालयात आयोजित प्रदर्शनीचे उदघाटन कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, विस्तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ धिरजकुमार कदम, प्राचार्य डॉ सय्यद ईस्माईल, प्राचार्य डॉ गिरीधर वाघमारे, प्राचार्य डॉ उदय खोडके, प्राचार्य डाॅ भगवान आसेवार, सहयोगी अधिष्ठाता (निम्न शिक्षण) डॉ गजेंद्र लोंढे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि म्हणाले की, देशावर ब्रिटिशांनी फोडा आणि राज्य करा यानितीचा अवलंब करून दिडशे वर्ष राज्य केले. देशाला स्वातंत्र तर मिळाले परंतु देशाची फाळणी फारच वेदनादायी होती. दहा लाख पेक्षा जास्त लोकांना आपले प्राण गमवावे लागले. लाखो कूटुब विस्तापित झाले, त्यांची ताटातुट झाली, आजही देशाची फाळणीच्या स्मृती या वेदनादायी आहेत. फाळणीत नागरिकांनी अनुभवलेल्या वेदनांची जाणीव आजच्या युवकांना व्हावी या उद्देश्याने देशात फाळणी शोकांतिक स्मृती दिवस पाळला जात आहे. देशात जात, धर्म, संस्कृतीत विविधता असतांनाही आज आपला देश जगातील एक मजबुद राष्ट्र म्हणुन उभा आहे. देशाची अखंडता राखण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकांची आहे, असे ते म्हणाले.
प्रास्ताविकात शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले यांनी देशाच्या फाळणी शोकांतिक स्मृती दिवसानिमित्त फाळणी दरम्यानच्या वेदनादायी स्मृतीची जाणीव व्हावी या उद्देश्याने विद्यापीठातील विविध महाविद्यालयात फाळणी प्रसंगीच्या छायाचित्राचे प्रदर्शनी लावण्यात येणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ रणजित
चव्हाण यांनी केले तर आभार प्राचार्य डॉ सय्यद ईस्माईल यांनी मानले. कार्यक्रमास
विद्यापीठतील विविध विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेकरिता महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी तसेचे राष्ट्रीय
सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ प्रविण कापसे, डॉ अनुराधा लाड, डॉ मधुकर खळगे यांच्या मार्गदर्शनाखाली
स्वयंसेवक व स्वयंसेविकांनी परिश्रम घेतले.