Friday, August 12, 2022

वनामकृवितील उद्यानविद्या महाविद्यालयात फाळणी शोकांतिका स्मरण दिवसानिमित्त छायाचित्र प्रदर्शन

देशाची फाळणी दिनांक १४ ऑगस्ट १९४७ रोजी झाली, ही फाळणी भारतीयांकरिता अतिशय वेदनादायी होती. याबाबतची माहिती महाविद्यालयातील विद्यार्थ्‍यांना व्हावी या उद्देशाने उद्यानविद्या महाविद्यालयामध्ये फाळणी शोकांतिका स्मरण दिवसानिमित्त (विभाजन विभिषिका स्मरण दिन) दिनांक ११ ऑगस्ट रोजी फाळणीचे प्रसंग दर्शविणा-या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात होते.  या प्रदर्शनीचे उद्घाटन संचालक संशोधन डॉ. दत्‍तप्रसाद वासकर यांच्‍या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सय्यद इस्माईल, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी.एम.वाघमारे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मार्गदर्शनात डॉ. दत्‍तप्रसाद वासकर म्‍हणाले की, देश फाळणीचा इतिहास हा अत्यंत रक्तरंजित व वेदनादायी असुन त्यावेळी भारतातील लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागले. कित्येक कुटुंब उध्वस्त होऊन अनेकांना अन्याय अत्याचारास सामोरे जावे लागले. या इतिहासाची माहिती आजच्‍या पिढीला होण्यासाठी देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाविद्यालयात प्रदर्शनी आयोजित येत आहे. प्राचार्य डॉ. गिरिधारी वाघमारे यांनी फाळणीच्या वेळेस घडलेल्या घटनांची छायाचित्राबाबत माहिती दिली. कार्यक्रमास महाविद्यालयातील डॉ.बी.एम.कलालबंडी, डॉ.जी.पी.जगताप, डॉ.वी.वी.भगत, डॉ.ए.एस.लोहकरे, डॉ.पी.एस.देशमुख, डॉ.एस.वाय.ढाले, डॉ.एस.बी.पव्हणे आदीसह विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.