वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालय, रेशमी संशोधन योजन आणि कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण जागरूकता कृषि कार्यानुभव अंतर्गत दिनांक १ ऑगस्ट रोजी मानवत तालुक्यातील मौजे मंगरूळ येथे खरीप शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सरपंच श्री. जमीर पठाण हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन प्राचार्य डॉ सय्यद ईस्माईल हे उपस्थित होते. व्यासपीठावर रावे समन्वयक डॉ राजेश कदम, रेशीम संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. चंद्रकांत लटपटे, कृषि पर्यवेक्षक श्री कैलास कदम, शास्त्रज्ञ डॉ. विशाल अवसस्मल, डॉ. दत्ता बैनवाड, डॉ. राजेंद्र जाधव, कार्यक्रम अधिकारी डॉ. विक्रम घोळवे, रेशीम शेतकरी श्री. नाईकनवरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात सरपंच श्री. जमीर पठाण यांनी परभणी कृषि महाविद्यालय यांनी ग्रामीण जागरूकता कृषि कार्यानुभव उपक्रमाचा शेतकरी बंधुंना लाभ निश्चित होईल अशी आशा व्यक्त केली. मार्गदर्शनात प्राचार्य डॉ. सय्यद ईस्माईल म्हणाले की, विद्यापीठ शेतकरी बंधुंसाठी सदैव सेवेसाठी तत्पर असून शेतकरी बांधवानी विद्यापीठात आयोजित शेतकरी मेळाव्यास नियमितपणे सहभाग घ्यावा. दरवर्षी १८ मे रोजी विद्यापठ वर्धापन दिनी खरीप शेतकरी मेळावा, १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी रब्बी शेतकरी मेळावा तसेच ३ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले जयंती दिनी महिला शेतकरी मेळावा आयोजित करण्यात येतो, यात विद्यापीठ शास्त्रज्ञ विविध विषयावर मार्गदर्शन करतात. यात शेतकरी बांधवाना नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळते. नवीन तंत्रज्ञानाची जोड देऊन शेती उत्पन्न शक्य असल्याचे ते म्हणाले. डॉ. राजेश कदम यांनी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमाच्या कृषिकन्या व कृषिदुत यांचा विद्यापीठ तंत्रज्ञान विविध माध्यमाद्वारे शेतकयांपर्यंत पोहचविण्यास हातभार लागत असल्याचे मत व्यक्त केले.
मेळाव्यात
डॉ. विशाल अवसस्मल यांनी विविध पीकातील तण व्यवस्थापन
या विषयावर मार्गदर्शन केले तर पशुपालण
व दुग्धव्यवस्थापण यावर डॉ. दत्ता बैनवाड, सोयाबीन
पिकांतील किड व्यवस्थापनावर डॉ.
राजेंद्र जाधव, खरीप पीकातील रोग व्यवस्थानावर डॉ.
विक्रम घोळवे, रेशीम उद्योगावर डॉ.
चंद्रकांत लटपटे, कृषि विभागाच्या
विविध योजनांची माहितीबाबत कृषि पर्यवेक्षक श्री कैलास कदम आदींनी मार्गदर्शन
केले तर रेशीम शेतकरी श्री. नाईकनवरे
यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
मेळाव्याचे प्रास्ताविक डॉ. विक्रम घोळवे यांनी केले. सुत्रसंचालन कृषिकन्या देेेेेेवयानी माने हिने केले तर आभार वैशाली लोंढे हिने मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृषिकन्या भक्तीका माने, पुनम मोकाशे, त्रिवेना मुनघाटे, पुजा मगर, वैष्णवी माने, जाव्णवी मोरे, वैष्णवी नखाते, पुजा पदमगीरवार, हेमवंती पांगारकर, हर्षा पवार, प्रगती मगर, कांचन पन्नामवाड, रोहिनी जाधव, विनीता जेसवानी, श्रावणी काळे, राजनंदनी कदम, आर.बी.कदम, रेखा क-हाळे, स्वाती कौसाळे, काजल खैरे, पुजा कुलकर्णी, वैैैैैैष्णवी कुलकर्णी, कोम्या नावेेेश्री, मिहीरा काशीद, ज्योती लगड आदींनी परीश्रम घेतले. मेळाव्यास शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.