Thursday, August 4, 2022

रावे अंतर्गत मौजे बाभुळगाव येथे खरीप शेतकरी मेळावा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषी महाविद्यालय आणि कोरडवाहू शेती संशोधन केंद्र यांच्या विद्यमाने ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम (रावे) अंतर्गत दिनांक ३ ऑगस्ट रोजी परभणी जिल्ह्यातील मौजे बाभूळगाव येथे खरीप शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच श्री. गणेश दळवे हे होते तर व्यासपीठावर कोरडवाहू शेती संशोधन केंद्राचे प्रभारी तथा केंद्रप्रमुख डॉ. वासुदेव नारखेडे, कीटकशास्त्राचे विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, विस्तार कृषी विद्यावेता डॉ. गजानन गडदे, डॉ. दत्ता बैनवाड, डॉ.अनंत बडगुजर, कार्यक्रम अधिकारी डॉ. सुनीता पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात सरपंच श्री. गणेश दळवे यांनी ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव उपक्रमाचा शेतकरी बंधूंना लाभ होईल अशी आशा व्यक्त केली. मेळाव्‍यात डॉ. वासुदेव नारखेडे यांनी कोरडवाहू शेती व पीक व्यवस्थापन याबद्दल शेतकऱ्यांना माहिती दिली तर कीड व्यवस्थापन व मित्रकीटक यावर डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, खरीप पीक व्यवस्थापनावर डॉ. गजानन गडदे, पशुपालन व दुग्धव्यवस्थापनावर डॉ. दत्ता बैनवाड, कापूस व सोयाबीन पिकांतील कीड व्यवस्थापनावर डॉ. अनंत बडगुजर यांनी मार्गदर्शन केले. विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी शेतकऱ्यांच्या शेतीविषयक शंकाचे समाधान केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुनिता पवार यांनी केले. सूत्रसंचालन कृषीकन्या धनश्री रसाळ व मनीषा देवकते यांनी केले तर आभार प्राजक्ता नेहरकर यांनी मानले. सदर मेळाव्‍याचे आयोजन प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल, रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. राजेश कदम, सहसमन्वयक डॉ. प्रवीण कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कार्यक्रम अधिकारी डॉ.अनुराधा लाड, कृषीकन्या प्रतीक्षा यंदे, आयुषी वैद्य, नीलम पुणेकर, तेजस्विनी तुळसे, शेख शाहिस्ता, तृप्ती शेळके, कृतिका पवार, आरती वीर, अर्पिता लोखंडे, साक्षी शिराळे, उत्कर्षा टाले, मनीषा सिसोदे, श्रुतिका सोळंके,सायमा जुबिन, भक्ती मुक्तावार,सय्यद यास्मिन, श्रावणी शिंदे, अंकिता शिंदे,दुर्गा ठोंबरे, अश्विनी तळेकर आदींनी परिश्रम घेतले.