वनामकृवितील कृषि विस्तार शिक्षण विभागातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा उपक्रम
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्तार शिक्षण विभागाच्या
पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आझादी का अमृत महोत्सव भित्तीपत्रकाचे
विमोचन कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि यांच्या हस्ते दिनांक १५ ऑगस्ट रोजी करण्यात
आले. कार्यक्रमास माननीय कुलगुरू यांच्या सुविद्य पत्नी मा श्रीमती जया इन्द्र मणि
मिश्रा, श्री सौमित्र मिश्रा, शिक्षण संचालक
डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण
संचालक डॉ देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ धिरजकुमार कदम, प्राचार्य डॉ
सय्यद ईस्माईल, प्राचार्य डॉ उदय खोडके, प्राचार्या
डॉ जया बंगाळे, सहयोगी अधिष्ठाता (निम्न शिक्षण) डॉ गजेंद्र
लोंढे, विभाग प्रमुख डॉ राजेश कदम, विद्यापीठ उपअभियंता
डॉ दयानंद टेकाळे आदीची प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि म्हणाले की, विस्तार शिक्षण
विभागातील विद्यार्थ्यांनी विद्यापीठाचे कृषि तंत्रज्ञान जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत
पोहचविण्यासाठी कार्य करावे. कृषि तंत्रज्ञान वापरात येणा-या शेतकरी बांधवाच्या समस्या
समजुन घ्यावीत.
स्वांतत्र्य लढयात योगदान देणा-या महान व्यक्तीरेखा तसेच कृषि क्षेत्रात मागील ७५ वर्षात देशांने केलेला विकास यावर आधारित सदर भित्तिपत्रक पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी तयार केले होते. माननीय कुलगुरू यांनी विभाग राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांबाबत समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात विभाग प्रमुख डॉ राजेश कदम यांनी विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली तर संगिता हुलमुखे हिने आपले मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन डॉ प्रविण कापसे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ एस आर जक्कावाड, डॉ एम आय खळगे, डॉ आर सी सावंत, डॉ अनुराधा लाड, डॉ एम व्ही भिसे आदींच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती सवंडकर, श्री मस्के, किरण बनसोडे, पांचाळ, विभागातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.