Friday, August 12, 2022

वनामकृवितील कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयात आंतरराष्‍ट्रीय युवा दिन साजरा

देशाच्या विकासासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी युवकांनी एकजुटीने काम करावे ...... प्राचार्य डॉ. उदय खोडके

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि अभियांत्रिकी महा‍विद्यालयात दिनांक १२ ऑगस्‍ट रोजी आंतरराष्‍ट्रीय युवा दिन साजरा करण्‍यात आला. कार्यक्रमाच्‍य अध्‍यक्षस्‍थानी प्राचार्य डॉ उदय खोडके हे होते तर कार्यक्रमास विभागप्रमुख प्रा. विवेकानंद भोसले, डॉ.स्मिता खोडके, प्रा.भास्कर भुइभार, डॉ.हरीश आवारी, डॉ.सुभाष विखे, डॉ.पंडित मुंडे, डॉ.सुमंत जाधव, डॉ.संदीप पायाळ, प्रा.मधुकर मोरे, डॉ.प्रमोदिनी मोरे, डॉ.विशाल इंगळे, प्रा.दत्तात्रय पाटील, मंगेश राऊत आदींची उपस्थिती होती.    

मार्गदर्शनात प्राचार्य डॉ. उदय खोडके म्‍हणाले की, राष्ट्राच्या उभारणीत आणि विकासात तरुणांची भूमिका महत्त्वाची असते. अशा परिस्थितीत तरुणांनी आपल्या देशाची आणि जगाची सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थिती समजून घेऊन समाज एकसंघ ठेवण्यासाठी कार्य करायला हवे. त्यांना देशाच्या आणि जगाच्या विकासात रस असायला हवा. तसेच, आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना स्वत:ला एक जबाबदार तरुण होण्याचे वचन द्यावे आणि देशाच्या विकासासाठी उज्ज्वल भविष्यासाठी काम करावे असे त्यांनी आवाहन केले.

आंतरराष्ट्रीय स्तरावर संयुक्त राष्ट्रसंघाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार १२ ऑगस्ट हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा केला जातो. पहिल्यांदा १२ ऑगस्ट २००० रोजी साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय युवा दिन २०२२ चा विषय “इंटरजनरेशनल सॉलीडॅरिटी: सर्व वयोगटासाठी एक जग तयार करणे” हा आहे. प्रास्ताविकात राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. रवींद्र शिंदे यांनी आंतरराष्ट्रीय युवा दिनाची माहिती दिली.

याप्रसंगी महाविद्यालयात राष्‍ट्रीय सेवा योजनेच्‍या माध्‍यमातुन फाळणी शोकांतिक स्‍मृती निमित्‍त (विभाजन विभिषिका स्‍मृती) फाळणी प्रसंगीचे छायाचित्रांच्‍या प्रदर्शनीचे आयोजन करण्‍यात आलेले होते. प्रदर्शनीचे उदघाटन प्राचार्य डॉ. उदय खोडके यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रासेयो स्वयंसेवक मंगेश मोहिते केले तर आभार विश्वनाथ तिकटे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता केदार भोगावकर, दत्ता पवार, आकांक्षा डढाळे, नेहा जाधव, निशा भारती, श्वेता नीलवर्ण, सिद्धेश्वर दुबे आदी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.