राज्याचे माननीय कृषिमंत्री ना. श्री. अब्दुल सत्तार यांनी नांदेड येथे दिनांक २१ ऑगस्ट रोजी कृषि विभागाची विभागीय आढावा बैठक घेतली व प्रक्षेत्र भेटी दिल्या तसेच लातुर जिल्हयामधील औसा तालूक्यातील करजगाव, येरंडी, सारोळा, जयनगर तर लातुर तालूक्यातील पेठ, वासणगाव तसेच उस्मानाबाद जिल्हयामधील उमरगा तालुक्यातील कवठा या गावातील शंखी गोगलगाय व सोयाबीन पिकांतील पिवळा मोझॅक रोगाने प्रादुर्भावग्रस्त प्रक्षेत्राची पाहणी केली. नांदेड दौरा दरम्यान कृषिमंत्री मा ना. श्री अब्दुल सत्तार व कृषि सचिव श्री एकनाथ डवले यांच्या नांदेडचे माननीय खासदार श्री प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी मुख्यमंत्री श्री अशोकराव चव्हाण, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्हयातील माननीय आमदार उपस्थित होते तर लातुर विभागाचे विभागीय कृषि सहसंचालक श्री साहेबराव दिवेकर, औसा, उमरगा, उदगीर मतदार संघाचे माननीय आमदार, लातुर व उस्मानाबाद जिल्हयाचे माननीय जिल्हाधिकारी, कृषि विभागातील अधिकारी हे उपस्थित होते.
दौ-या दरम्यान वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या चमुने शंखी गोगलगायचा प्रादुर्भाव तसेच पिवळा मोझॅक या रोगाचा
प्रादुर्भाव हा अधिक वाढु नये, याबाबत उपाययोजना सुचवल्या. सदर प्रादुर्भावग्रस्त
भागात विद्यापीठ शास्त्रज्ञांनी या अगोदर ही चार ते पाच वेळा भेटी देऊन शेतक-यांना
किड व रोग व्यवस्थापना बाबत मार्गदर्शन केले होते. व्यवस्थापनाच्या उपाययोजना
केलेल्या ठिकाणी प्रादुर्भाव मर्यादित स्वरूपात दिसून आला. याबाबत माननीय मंत्री महोदय व माननीय सचिव महोदयांनी समाधान व्यक्त केले.
विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. इन्द्र मणि यांच्या सुचनेनुसार व संचालक विस्तार शिक्षण डॉ देवराव देवसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ पथकात नांदेड येथे किटकशास्त्रज्ञ डॉ. पी. आर. झंवर, डॉ संजीव बंटेवाड, डॉ आर व्ही चव्हाण तसेच लातूर येथे कृषि किटकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. पी. एस. नेहरकर, विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ. अरुण गुट्टे, विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ. वसंत सूर्यवंशी, क्रॉपसॅप प्रकल्प समन्वय अधिकारी डॉ. अनंत लाड, किटकशास्त्रज्ञ डॉ. विजय भांबरे, पिक रोग शास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही. अंबडकर, पिक रोग शास्त्रज्ञ डॉ. पी. जी. मुळेकर, संशोधन सहयोगी डॉ. राजरतन खंदारे, डॉ. योगेश म्हात्रे आदींचा समावेश होता.