Friday, August 12, 2022

वनामकृवितील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राच्‍या वतीने आयोजित महिला कार्यशाळा संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचालनालयाच्‍या कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राच्‍या वतीने आझादी अमृत महोत्सवाच्‍या निमित्‍ताने दिनांक १२ ऑगस्ट रोजी एक दिवसीय महिला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विस्तार कृषी विद्यावेत्ता तथा केंद्राचे व्यवस्थापक डॉ.गजानन गडदे हे होते तर प्रमुख वक्त्या डॉ.मधुमती कुलकर्णी, कृषी विभाग आत्माच्या अधिकारी श्रीमती स्वाती घोडके यांची उपस्थिती होती.

मार्गदर्शनात डॉ. मधुमती कुलकर्णी यांनी भारतीय संस्कृती जपण्यात महिलांची भूमिका महत्‍वाची असुन भारत देश जगातील महासत्ता करायची असेल तर प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढविणे गरजेचे असल्‍याचे सांगुन महिला सक्षमीकरण या विषयावर मनोगत व्यक्त केले.

अध्यक्षीय समारोपात डॉ.गडदे यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये पुरुषांच्‍या खांद्याला खांद्या लावुन महिल्‍याही सहभागी होत्‍या तसेच वेळ प्रसंगी महिलांनी सुद्धा बलिदान दिल्याचे त्‍यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.मधुकर मांडगे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी ज्ञानोबा माहोरे दिगंबर रेंगे, नितीन मोहिते, शेख साजेद, श्री.डिकळे आणि शेख सुलताना यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास महिला शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होत्‍या.