वनामकृवि येथे गाजर गवत निर्मुलन जागृती सप्ताह संपन्न
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठातील परोपजीवी कीटक संशोधन योजना आणि कृषि कीटकशास्त्र विभाग यांच्या संयुक्त
विद्यमाने गाजर गवत निर्मुलन जागृकता सप्ताह निमित्त दिनांक २३ ऑगस्ट रोजी कुलगुरू
मा. डॉ. इन्द्र मणि यांच्या हस्ते ज्वार संशोधन केंद्राच्या परिसरात गाजर गवतावर उपजीवीका
करणारे झायगोग्रामा भुंगे (मेक्सिकन बिटल) गाजर गवतावर सोडण्यात आले.
कार्यक्रमास संचालक संशोधन डॉ.
दत्तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ. सय्यद ईस्माईल,
कुलसचिव डॉ. धिरजकुमार कदम, कृषि
कीटकशास्त्राचे विभाग प्रमुख डॉ पुरूषोत्तम नेहरकर आदीची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय मार्गदर्शनात कुलगुरू
मा डॉ. इन्द्र मणि म्हणाले की, झायगोग्रामा
भुंग्याद्वारे पर्यावरणाचे कोणतेही नुकसान न करता गाजर गवताचे समूळपणे नायनाट करू
शकतो, या भुंग्याची संख्या मोठया प्रमाणात नैसर्गिकरित्या वर्षानुवर्षे वाढत
राहते. विद्यापीठात उपलब्ध झायगोग्रामा भुंगे शेतकरी बांधवाच्या शेतात तसेच गाव परिसरात
सोडुन शास्त्रज्ञांनी मार्गदर्शनात करावे.
झायगोग्रामा भुंग्यांचा वापर
करुन गाजर गवताचे जैविक पध्दतीने निर्मुलन बाबत माहिती परोपजीवी कीटक संशोधन योजनच्या
प्रभारी अधिकारी डॉ. श्रध्दा धुरगुडे यांनी माहिती दिली. सदरिल झायगोग्रामा
भुंग्याचे विद्यापीठातील परोपजीवी कीटक संशोधन योजनेतील प्रयोगशाळेत मोठ्या
प्रमाणावर गुणन केले जाते. शेतकऱ्यांना नाममात्र दरात ते उपलब्ध करून देण्याचे काम
मागील
बऱ्याच वर्षापासून सुरु आहे. मराठवाडा, विदर्भ,
पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची ह्या भुंग्याला मोठया प्रमाणात मागणी होत आहे. यास
शेतकऱ्यांचा दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद असतो. या वर्षी सुध्दा जास्तीत
जास्त शेतक-यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
दिनांक १६ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट दरम्यान
विद्यापीठातील विविध महाविद्यालयाच्या माध्यमातुन गाजर गवत निर्मुलन जागरूकता सप्ताहा
साजरा करून जगजागृती करण्यात आली. कार्यक्रमास सहाय्यक परोपजीवी शास्त्रज्ञ डॉ.
श्रद्धा धुरगुडे, डॉ. पुरुषोत्तम झंवर, डॉ.एस.एस.गोसलवाड, डॉ. मो. ईलीयास, डॉ.
पी.एच. वैद्य, डॉ. गजानन गडदे, डॉ. कमलाकर कांबळे, डॉ. मिलिंद सोनकांबळे, डॉ. अनंत
लाड, डॉ. डिगांबर पटाईत, डॉ. के.डी. नवघरे, डॉ. फारिया खान, श्री. गणेश खरात, डॉ.
राजरतन खंदारे, डॉ. संजोग बोकन, डॉ. योगेश म्हात्रे, श्री. धनंजय मोहड, श्री.
अनुराग खंडारे, श्री.मधुकर मांडगे श्री. बालाजी कोकणे, श्री. दिपक लाड, श्री.
योगेश विश्वांभरे आदीसह कीटकशास्त्र विभागातील कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित
होते.