कृषि महाविद्यालयात आझादी का अमृत महोत्सव आणि आंतरराष्ट्रीय युवा दिना आयोजित कार्यक्रमात प्रतिपादन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने दिनांक १२ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय युवा दिन आणि आझादी का अमृत महोत्सवाचे औजित्य साधुन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सर्वांगिन विकास वाढीकरिता पाच तत्व यावर बालक आणि प्रौढ विकास तज्ञा निवृत्त प्राध्यापिका डॉ विशाला पटणम यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ सय्यद ईस्माईल हे होते तर विभाग प्रमुख डॉ राजेश कदम, डॉ हिराकांत काळपांडे, शिक्षण प्रभारी डॉ रणजित चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शनात डॉ विशाला पटणम म्हणाल्या की, आजचे युवक हे देशाचे भविष्य असुन प्रत्येकात राष्ट्रा प्रती प्रेम पाहिजे, युवकांत सकारत्मक काम करण्याची उर्मी पाहिजे तसेच उत्तम कामगिरी करण्याची इच्छा, कामात सातत्य व चिकाटी पाहिजे, तरच देशाची प्रगती निश्चित आहे. युवकांनी जाणीवपुर्वक हे गुण आत्मसात केली पाहिजेत असा सल्ला त्यांनी दिला, तसेच त्यांनी देशाच्या तिरंगा ध्वजाचा इतिहास सांगितला.
अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ सय्यद ईस्माईल यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ अनुराधा लाड यांनी केले. सुत्रसंचालन रासेयो स्वयंसेविका कृतिका सुरजुसे हिने केले तर आभार श्रुती सतले हिने मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रासेयोचे कार्यक्रम अधिकारी डॉ अनुराधा लाड आणि डॉ मधुकर खळगे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.