Saturday, November 14, 2026

वनामकृवित पंडित जवाहरलाल नेहरू जयंतीनिमित्त अभिवादन; माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान, भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती १४ नोव्हेंबर २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीतील सिम्पोजियम सभागृहात सकाळी ११ वाजता अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश आहिरे, विभागप्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे यांच्यासह विद्यापीठातील विविध अधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमात उपकुलसचिव (सामान्य प्रशासन) श्री. पद्माकर पाटील यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनकार्याचा व देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील तसेच आधुनिक भारताच्या उभारणीतील त्यांच्या योगदानाचा संक्षिप्त परिचय करून दिला.

यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या राष्ट्रनिर्माणातील योगदानाचे स्मरण करून त्यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण केली.

कार्यक्रमास विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीतील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते.