Wednesday, November 11, 2026

बागायती पिकांच्या संशोधन व तंत्रज्ञान विकासासाठी वनामकृवि आणि राष्ट्रीय बागवानी अनुसंधान आणि विकास प्रतिष्ठान यांच्यात सामंजस्य करार

करारावर वनामकृविचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि प्रतिष्ठानचे संचालक डॉ. पी. के. गुप्ता यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

कांदा व लसूण पिकांच्या उत्पादनवाढीसह आधुनिक साठवणूक, काढणीपश्चात तंत्रज्ञान आणि संशोधनाला मिळणार चालना


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि राष्ट्रीय बागवानी अनुसंधान आणि विकास प्रतिष्ठान (National Horticultural Research and Development Foundation – NHRDF), नवी दिल्ली यांच्यात बागायती पिकांच्या संशोधन, तंत्रज्ञान विकास तसेच विस्तार कार्याला अधिक बळकटी देण्याच्या उद्देशाने दिनांक ११ नोव्हेंबर २०२६ रोजी सामंजस्य करार करण्यात आला. या करारावर वनामकृविचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि राष्ट्रीय बागवानी अनुसंधान आणि विकास प्रतिष्ठानचे संचालक डॉ. पी. के. गुप्ता यांनी स्वाक्षऱ्या केल्या. सदर सामंजस्य कराराची अंमलबजावणी सन २०२६ च्या रब्बी हंगामापासून सुरू होणार असून, त्याअंतर्गत प्रस्तावित संशोधन प्रकल्प, तंत्रज्ञान विकास आणि इतर अनुषंगिक उपक्रम प्रत्यक्षात राबविण्यात येणार आहेत.

या सामंजस्य करारामुळे दोन्ही संस्थांमधील संशोधन व विस्तार कार्यातील परस्पर सहकार्य अधिक दृढ होणार असून, विशेषतः कांदा व लसूण या महत्त्वाच्या बागायती पिकांच्या उत्पादनवाढीसाठी, सुधारित वाणांच्या विकासासाठी तसेच काढणीपश्चात तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी संयुक्त प्रयत्न करण्यात येणार आहेत.

या करारांतर्गत गरजेनुसार संशोधन कार्यक्रमांची आखणी करून बागायती पिकांच्या नवीन वाणांचा विकास, उत्पादन तंत्रज्ञान आणि काढणीपश्चात तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे. राष्ट्रीय बागवानी अनुसंधान आणि विकास प्रतिष्ठानने विकसित केलेल्या कांद्याच्या प्रगत व आशादायी वाणांचे महाराष्ट्र राज्यातील लागवडीसाठी मूल्यमापन करण्यात येणार आहे. तसेच कांदा साठवणुकीच्या आधुनिक संरचनांमध्ये सुधारणा करून ऊर्जा वापर कमी करण्यासंदर्भात संशोधन केले जाणार आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने विकसित केलेल्या कांद्याच्या वाणांचे तसेच कांदा बियाणे पेरणी व रोपलागवडीसाठी विकसित केलेल्या कृषि अवजारांचे इतर कांदा उत्पादक राज्यांमध्ये मूल्यमापन व प्रमाणीकरण करण्यासाठी NHRDF सहकार्य करणार आहे. याशिवाय केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून संयुक्त संशोधन, प्रशिक्षण, प्रात्यक्षिके आणि विकसित तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांपर्यंत प्रसार करण्याचे नियोजन आहे.

या सहकार्यातून दोन्ही संस्थांतील शास्त्रज्ञ, संशोधक व प्राध्यापकांना संशोधन आणि प्रशिक्षण सुविधांचा परस्पर लाभ घेता येणार असून, वैज्ञानिक माहिती, प्रयोगांचे निष्कर्ष, तांत्रिक माहिती आणि विकसित तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करण्यात येणार आहे. सामंजस्य कराराच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक यांच्या अध्यक्षतेखाली पुनरावलोकन व अंमलबजावणी समिती स्थापन करण्यात येणार आहे. या कराराचा कालावधी पाच वर्षांचा राहणार आहे.

या सामंजस्य करारामुळे बागायती पिकांच्या संशोधनाला नवी दिशा मिळण्यासोबतच कांदा व लसूण उत्पादक शेतकऱ्यांसाठी आधुनिक उत्पादन तंत्रज्ञान, सुधारित वाण, कार्यक्षम साठवणूक व्यवस्था आणि काढणीपश्चात तंत्रज्ञान उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

करारप्रसंगी  राष्ट्रीय बागवानी अनुसंधान आणि विकास प्रतिष्ठानचे अधिकारी उपस्थित होते. सामंजस्य करारानंतर दोन्ही संस्थांच्या प्रमुखांनी परस्पर सहकार्याच्या माध्यमातून संशोधन व तंत्रज्ञान विकासाला गती देण्याचा विश्वास व्यक्त केला.





For English

MoU Signed Between VNMKV and National Horticultural Research and Development Foundation to Promote Research and Technology Development in Horticultural Crops

 

Agreement signed by Hon’ble Vice-Chancellor of VNMKV, Prof. (Dr.) Indra Mani, and Director of NHRDF, Dr. P. K. Gupta

 

Research on onion and garlic production, modern storage facilities, post-harvest technologies and technological innovations to receive a major boost

  

Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth (VNMKV), Parbhani, and the National Horticultural Research and Development Foundation (NHRDF), New Delhi, signed a Memorandum of Understanding (MoU) on November 11, 2026, with the objective of strengthening collaborative research, technology development, and extension activities in horticultural crops. The MoU was signed by the Hon’ble Vice-Chancellor of VNMKV, Prof. (Dr.) Indra Mani, and the Director of NHRDF, Dr. P. K. Gupta. The implementation of the MoU will commence from the Rabi season of 2026, with various proposed research projects, technology development initiatives, and related activities being undertaken jointly.

The MoU is expected to strengthen mutual cooperation between the two institutions in research and extension activities, particularly focusing on increasing the productivity of important horticultural crops such as onion and garlic, developing improved varieties, and undertaking research on post-harvest technologies.

Under this agreement, joint research programmes will be designed as per the requirements, with emphasis on the development of new varieties of horticultural crops, improved production technologies, and post-harvest management technologies. Advanced and promising onion varieties developed by NHRDF will be evaluated for their suitability under Maharashtra's agro-climatic conditions. Research will also be undertaken to improve modern onion storage structures with a focus on reducing energy consumption and enhancing storage efficiency.

NHRDF will extend its cooperation in evaluating and validating onion varieties developed by VNMKV, along with agricultural implements developed by the University for onion seed sowing and transplanting, in other major onion-producing states. Furthermore, joint research, training programmes, demonstrations, and dissemination of developed technologies among farmers will be undertaken through various Central and State Government schemes.

Through this collaboration, scientists, researchers, and faculty members of both institutions will have mutual access to research and training facilities. The two institutions will also facilitate the exchange of scientific information, experimental results, technical knowledge, and developed technologies. To ensure effective implementation of the MoU, a Review and Implementation Committee will be constituted under the chairmanship of the Director of Research, VNMKV. The MoU will remain valid for a period of five years.

This collaboration is expected to provide a new direction to horticultural research and benefit onion and garlic growers through access to modern production technologies, improved varieties, efficient storage systems, and advanced post-harvest management practices.

Officials of the National Horticultural Research and Development Foundation were present on the occasion. Following the signing of the MoU, the heads of both institutions expressed confidence that the collaboration would accelerate research and technology development through mutual cooperation.