दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी पाणी अडवा, पाणी जिरवा आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन
छत्रपती शाहू महाराज
बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि श्रीमंतयोगी सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त
विद्यमाने दि. १० नोव्हेंबर २०२६ रोजी देवलगाव आवचार (ता. मानवत,
जि. परभणी) येथे
‘दुष्काळी परिस्थितीत मृदा व जलसंधारणाची कामे आणि उपलब्ध पाण्याचा सिंचनासाठी
कार्यक्षम वापर’ या विषयावर शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमात वसंतराव
नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील अखिल भारतीय समन्वित
कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ (मृद व जलसंधारण अभियांत्रिकी)
डॉ. मधुकर मोरे यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन
केले. त्यांनी बदलते पर्जन्यमान, हवामान बदलाचे शेतीवरील
परिणाम, कोरडवाहू शेतीतील मृदा व जलसंधारणाचे महत्त्व,
जमिनीतील ओलावा टिकविण्याच्या विविध उपाययोजना, सूक्ष्म सिंचनाचा कार्यक्षम वापर तसेच शाश्वत शेती पद्धती याविषयी सविस्तर
माहिती दिली.
अनियमित पावसाच्या
पार्श्वभूमीवर जमिनीवर पडणारे पावसाचे पाणी अडविणे, ते जमिनीत मुरविणे
आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे अत्यंत आवश्यक असल्याचे डॉ. मोरे यांनी
स्पष्ट केले. शेतातील बांधबंदिस्ती, शेततळ्यांच्या
माध्यमातून पाणीसाठा निर्माण करणे, ठिबक व तुषार
सिंचनासारख्या सूक्ष्म सिंचन पद्धतींचा अवलंब करणे यामुळे पाण्याची बचत
होण्यासोबतच पीक उत्पादनात स्थिरता राखण्यास मदत होते, असेही
त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी गावचे सरपंच श्री. केशवराव आवचार होते, तर
प्रमुख पाहुणे म्हणून गावचे माजी सरपंच श्री. माणिकराव आवचार आणि प्रा. डॉ. राम
मोरे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे
प्रास्ताविक डॉ. ज्ञानेश्वर आवचार यांनी केले. त्यांनी कार्यक्रम आयोजनामागील
भूमिका विशद करताना दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी गावपातळीवर मृदा व
जलसंधारणाची लोकचळवळ उभी करणे, उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करणे आणि
शेतकऱ्यांमध्ये जलव्यवस्थापनाविषयी जागृती निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे
सांगितले.
कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन दिव्या शेळके आणि अश्विनी आवचार यांनी केले, तर
आभार प्रदर्शन श्री. श्याम आवचार यांनी केले.
कार्यक्रमाच्या
यशस्वितेसाठी इंजि. गोविंद आवचार, ॲड. गजानन आवचार, डॉ.
महेश पान्हेरे, श्री. बालाजी दिवटे, श्री.
मंगेश आवचार, श्री. श्याम आवचार, श्री.
पंढरीनाथ आवचार आणि डॉ. ज्ञानेश्वर आवचार यांनी विशेष परिश्रम घेतले.


.jpeg)