अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठ आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांचा
संयुक्त उपक्रम
मराठवाडा हा प्रामुख्याने कोरडवाहू प्रदेश असून येथे शेतीतील अनेक कामे, विशेषतः पेरणी, अजूनही पारंपरिक पद्धतीने केली जाते. विविध पिकांच्या पेरणीचे करिता एकच किफायतीशीर पेरणी अत्यंत आवश्यक असून, त्यामुळे वेळेत पेरणी होऊन जमिनीत असलेल्या ओलाव्याचा योग्य व प्रभावी वापर करता येतो. ही बाब लक्षात घेऊन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी आणि पर्ड्यू विद्यापीठ, अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाडा प्रदेशातील लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी कमी खर्चिक व कमी देखभालाची आवश्यकता असलेले बी पेरणी यंत्र तयार करण्यात आले असुन दिनांक ३ मे रोजी याची यंत्राची चाचणी प्रत्यक्ष शेतकरी बांधवांनी वापरून करण्यात आली आहे. यावेळी आयोजित संवाद बैठकीच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते तर अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठातील कृषी व जैव अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक डॉ. धर्मेंद्र सरस्वत यांची विशेष उपस्थिती होते. सदर बैठकीचे आयोजन डॉ. राहुल टी. रामटेके, सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, परभणी यांनी केले.
यंत्राबाबत माहिती देतांना कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि म्हणाले की, सदरील यंत्र अल्पभुधारक शेतकरी बांधना उपयुक्त असुन या यंत्रणेमुळे श्रम कमी होऊन उत्पादनक्षमता वाढण्यास मदत होईल. शेतकरी बांधवाच्या सुचनेनुसार यंत्रात बदल करण्यात येणार आहेत. शेतकरी महिलांनाही हे यंत्र वापर करता यावा, याकरिता प्रयत्न करण्यात येणार आहे, सदर यंत्र बॅटरी चलित देखिल तयार करण्यात येणार आहे. डॉ. धर्मेंद्र सरस्वत म्हणाले की, मराठवाडा प्रदेशातील लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी कमी खर्चिक व कमी देखभालीची बी पेरणी यंत्र तयार करण्यात आले असुन यात शेतकरी बांधवाच्या अभिप्राय नुसार पुन्हा बदल करण्यात येणार आहे, यामुळे याची उपयुकतता वाढेल.
या तंत्रज्ञानाच्या विकासासाठी विद्यापीठाच्या संशोधकांनी शेतकऱ्यांशी विविध संवाद बैठकांचे आयोजन करून तसेच सर्वेक्षणाद्वारे पेरणीसंबंधित त्यांच्या गरजा व अभिप्राय जाणून घेतले. शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष गरजांनुसार ही बी पेरणी यंत्रणा डिझाइन व विकसित करण्यात आले असून यांचा उपयोग प्रत्यक्ष शेतकरी बांधवांनी करून त्याबाबत अभिप्राय दिले, यात त्याप्रमाणे बदल करण्यात येणार आहे. या कार्यक्रमादरम्यान परिसरातील प्रगतशील शेतकरी श्री. जनार्दन आवारगंड, श्री. रमेश पवार, श्री. विद्याधर संगई, श्री. विश्वशंकर जावळे आदी यांनी प्राध्यापक डॉ धर्मेंद्र सरस्वत यांच्याशी संवाद साधून विकसित यंत्राबाबत आपले अभिप्राय व सुचना दिल्या. हा प्रकल्प माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रमुख संशोधक (Principal Investigator) म्हणून नेतृत्वाखाली राबविण्यात येत असुन कृषि अभियंता डॉ. स्मिता सोलंकी व सह-प्रमुख संशोधक डॉ. ओमकार गुप्ताया यांचा सहभाग आहे. या प्रसंगी डॉ. डी. डी. टेकाळे, डॉ प्रविण कापसे, डॉ. अनिकेत वायकर, डॉ. जी. एच. वासू, डॉ अनिल हरकल, डॉ विशाल काळबांडे आदी उपस्थित होते.

.jpeg)
.jpeg)