वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालनालय व कृषि विभाग, महाराष्ट्र
शासन यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या ५४ व्या वर्धापन दिनानिमित्त
सोमवार दिनांक १८ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता विद्यापीठाच्या सुवर्ण जयंती
दीक्षांत सभागृह येथे “खरीप पीक परिसंवाद व कृषि प्रदर्शन” आयोजित करण्यात आले
आहे.
या कार्यक्रमाचे
उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे कृषि मंत्री माननीय ना. श्री. दत्तात्रय भरणे यांच्या
हस्ते होणार असून विशेष अतिथी म्हणून राज्याच्या वित्त, नियोजन,
कृषि, मदत व पुनर्वसन, विधी
व न्याय, कामगार राज्यमंत्री माननीय ना. अॅड. आशीष जयस्वाल
आणि सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा व
स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालकल्याण,
सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) तथा पालकमंत्री परभणी जिल्हा
माननीय ना. श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे राहणार
आहेत.
कार्यक्रमास राज्यसभा सदस्य माननीय खासदार श्री अशोक
चव्हाण,
राज्यसभा सदस्य माननीय डॉ. खासदार अजित गोपछडे, राज्यसभा सदस्य
माननीय खासदार श्री रामराव वडकुते, लोकसभा सदस्य माननीय खासदार श्री संजय जाधव,
विधान परिषद सदस्य माननीय आमदार श्री सतीश चव्हाण, विधान परिषद सदस्य माननीय आमदार
श्री. विक्रम काळे, विधानसभा सदस्य माननीय आमदार डॉ. राहुल पाटील, विधानसभा सदस्य
माननीय आमदार श्री. रत्नाकर गुट्टे, विधानसभा सदस्य माननीय आमदार श्री. बालाजी
कल्याणकर, विधानसभा सदस्य माननीय आमदार श्री. राजेश विटेकर, विधानसभा सदस्य माननीय
आमदार श्रीमती श्रीजया चव्हाण हे प्रमुख अतिथी राहणार आहेत.
कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र कृषि शिक्षण व
संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष माननीय नामदार श्री तुषार पवार आणि भारतीय कृषि
अनुसंधान परिषदेचे माजी महासंचालक तथा वाराणसी येथील बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे
माजी कुलगुरू माननीय डॉ. पंजाब सिंग, विद्यापीठ कार्यकारी परिषद
सन्मानीय सदस्य माननीय डॉ. कौशिक बॅनर्जी, माननीय डॉ. व्ही. एम. मायंदे हे उपस्थित राहणार
आहेत.
महाराष्ट्र शासनाचे
कृषि सचिव माननीय डॉ. परिमल सिंग (भाप्रसे), पुणे येथील कृषि परिषदेचे महासंचालक मा. श्री. राहुल रंजन महिवाल
(भाप्रसे), अकोला येथील
महाराष्ट्र राज्य बियाणे
महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक
माननीय श्री. दिलीप
स्वामी (भाप्रसे) यांची
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार,
संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, कुलसचिव श्री. पुरभा काळे,
विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, नियंत्रक श्री. अनंत कदम
आदींची कार्यक्रमास उपस्थिती राहणार आहे.
या
परिसंवादामध्ये खरीप हंगामातील विविध पिकांचे नियोजन, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत शेती
तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन तसेच आधुनिक कृषि तंत्रज्ञान
याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासोबतच कृषि प्रदर्शनामध्ये विविध कृषि
तंत्रज्ञान, सुधारित वाण, यंत्रसामग्री
तसेच कृषि पूरक उद्योगांचे प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. कार्यक्रमात
मान्यवरांच्या हस्ते विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी लिहिलेल्या विविध घडीपत्रिका,
पुस्तिका व ‘शेतीभाती’ मासिकाचे प्रकाशन करण्यात येईल.
कार्यक्रमाची सुरुवात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठ,
परभणी अंतर्गत बीज प्रक्रिया केंद्रामार्फत खरीप हंगाम २०२६ साठी
विविध पिकांचे दर्जेदार बियाणे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या बियाणे
विक्रीने होणार आहे.
विद्यापीठाने ज्वारी, मूग, तूर,
सोयाबीन आणि बाजरी या पिकांच्या सुधारित वाणांचे बियाणे विक्रीस
ठेवले असून शेतकऱ्यांनी लवकरात लवकर खरेदी करून लाभ घ्यावा, असे
आवाहन करण्यात आले आहे.
उपलब्ध बियाण्यामध्ये ज्वारीचे ‘परभणी शक्ती’,
मूगाचे ‘बीएम-२००३-२’, तुरीचे ‘बीडीएन-७१६
(लाल)’ व ‘बीडीएन-१३-४१ गोदावरी (पांढरी)’, सोयाबीनचे
‘एमएयूएस-१६२, एमएयूएस-६१२ व एमएयूएस-७१’ तसेच बाजरीचे
‘एचबी-१२००’ या वाणांचा समावेश आहे.
बियाण्यांचे
दर प्रति किलोनुसार निश्चित करण्यात आले असून ज्वारी बियाणे १२५ रुपये प्रति किलो, मूग २२० रुपये प्रति किलो व तूर २५० रुपये
प्रति किलो, सोयाबीन १०० रुपये प्रति किलो आणि बाजरी १९०
रुपये प्रति किलो दराने उपलब्ध आहे. बियाण्यांची विक्री बॅगनिहाय करण्यात येत असून
विविध पिकांचे एकूण ३९७.२० क्विंटल बियाणे उपलब्ध असल्याची माहिती बीज प्रक्रिया
केंद्राने दिली आहे.
शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी बीज प्रक्रिया केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्रमास शेतकरी, कृषि अधिकारी, विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे व जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. दौलत चव्हाण यांनी केले आहे.
.jpeg)
