वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे
क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांची जयंती दिनांक १५ नोव्हेंबर २०२६ रोजी
उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त विद्यापीठाच्या प्रशासकीय
इमारतीतील सिम्पोजियम सभागृहात सकाळी ११ वाजता अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात
आले होते.
यावेळी
विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांच्या हस्ते क्रांतिसूर्य
भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी विद्यापीठातील विविध अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमात
उपकुलसचिव (सामान्य प्रशासन) श्री. पद्माकर पाटील यांनी क्रांतिसूर्य भगवान बिरसा
मुंडा यांच्या जीवनकार्याचा, सामाजिक संघर्षाचा तसेच देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या
महत्त्वपूर्ण योगदानाचा संक्षिप्त परिचय करून दिला.
यावेळी
उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या राष्ट्रनिर्माणातील
योगदानाचे स्मरण करून त्यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण केली.

.jpeg)
.jpeg)