वनामकृवितील अभ्यासक्रम
नवीन शैक्षणिक वर्षास प्रारंभ झाल्याने पालक व विद्यार्थ्याची विविध
शाळा - महाविद्यालयात प्रवेश घेण्याविषयी लगबग सुरु आहे. विशेषतः बारावी उत्तीर्ण
झालेल्या विद्यार्थ्याच्या पुढील शिक्षणासाठी अभ्यासक्रम निवडत असतांना त्यासाठी
अनेक पर्याय उपलब्ध असल्याने पालक व स्वतः विद्यार्थ्यांनी अतिशय चोखंदळपणे अभ्यासक्रमाची निवड करणे महत्वाचे आहे. तेव्हा
जे विद्यार्थी करिअरच्या नव्या वाटा शोधत आहेत त्यांच्यासाठी सामुदायिक विज्ञान
(कम्युनिटी सायन्स) या अभ्यासक्रमाविषयीची माहिती सदरील लेखात दिली आहे.
महाराष्ट्र
राज्यातील चार कृषि विद्यापीठांपैकी केवळ वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ,
परभणी येथे सामुदायिक विज्ञान हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. वैद्यकीय व अभियांत्रिकी
अभ्यासक्रमाप्रमाणेच कृषि विषयांतर्गत असणारा सामुदायिक विज्ञान हा व्यावसायिक
अभ्यासक्रम आहे. त्यामुळे तो पूर्ण करण्यासाठी चार वर्षाचा कालावधी लागतो. इयत्ता
१२ वी नंतर हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना बी.एसस्सी (ऑनर्स)
कम्युनिटी सायन्स ही पदवी प्राप्त होते. यशस्वी करिअरच्या दृष्टीने सामान्य
पदव्यांच्या तुलनेत ऑनर्स पदवीला विशेष महत्व असते. कृषि विद्यापीठात उपलब्ध
असणाऱ्या विविध अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून महाराष्ट्र शासनाने
सामुदायिक विज्ञान हा अभ्यासक्रम कृषि विद्यापीठातील इतर पदवी अभ्यास क्रमाशी
समतुल्य असल्याबाबतचा शासन निर्णय सन २०२१ मध्ये निर्गमित केला आहे.
प्रवेशासाठी
शैक्षणिक पात्रता : विद्यार्थ्यांने इयता १२ वी
(विज्ञान) उत्तीर्ण किंवा तत्सम परीक्षा याबरोबरच सक्षम विभागाकडून आयोजित करण्यात
आलेली एमएचटी सीईटी/ जेईई/ नीट सामायिक प्रवेश परीक्षा दिलेली असणे अनिवार्य आहे.
या अभ्यासक्रमसाठी मुला - मुलींना प्रवेश खुला असून शासनाने जाहीर केलेल्या सर्व
शिष्यवृतीचा लाभ पात्र विद्यार्थ्यांना दिला जातो. तसेच विद्यार्थ्यांनीना शुल्काच्या
बाबतीत असणाऱ्या सर्व सवलती लागू आहेत.
सामुदायिक
विज्ञान महाविद्यालय अभ्यासक्रमातील करिअर संधी : नवीन राष्ट्रीय
शैक्षणिक धोरणात पूर्व प्राथमिक शिक्षणाचा समावेशही शालेय अभ्यासक्रमात करण्यात
आल्याने लहान बालकांच्या शिक्षणाला विशेष महत्व आले आहे. सामुदायिक विज्ञान
अभ्यासक्रमात पूर्व प्राथमिक शिक्षणाविषयी विद्यार्थ्यांना पारंगत केले जात
असल्याने त्यांना या क्षेत्रात करिअर करण्याच्या नामी संधी उपलब्ध आहेत. याबारोबच जिल्हा
रुग्णालय, दवाखाना, क्रीडा कार्यालय, व्यायामशाळा, केंद्रीय राखीव पोलीस दल, रेल्वे
विभाग इत्यादी ठिकाणी आहारतज्ज्ञ याबरोबरच महाराष्ट्र महिला व बाल विकास अधिकारी,
आयसीडीएस पर्यवेक्षक, प्राध्यापक, शिक्षक,प्रशिक्षक, प्रशासकीय अधिकारी,
शास्त्रज्ञ, बिहेव्हीयर मॅाडिफिकेशन थेरपिस्ट, सामाजिक कार्यकर्ते, बँक तथा भारतीय
आयुर्विमा महामंडळ, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ (IIPH) आयसीएमआर- एन आय एन इत्यादीमध्ये शासकीय, निमशासकीय तथा खासगी स्तरावरील
विविध योजना व संस्थामध्ये कार्य करण्याच्या मुबलक संधी उपलब्ध आहेत. याबरोबरच या
अभ्यासक्रमात स्किल इंडिया मिशनला अनुसरुन स्टार्टअपला देखील भरपूर वाव असून विद्यार्थ्यांना
त्यांच्या स्वत:च्या दर्जेदार पूर्व प्राथमिक शाळा, पाळणाघरे,
आहार सल्ला केंद्र, बाल मार्गदर्शन व, समुपदेशन केंद्र, इंटेरीअर डिझायनिंग, बेकरी व कन्फेक्शनरी युनिट, कॅन्टीन, मेस, बुटीक, हॅन्डीक्राप्टस युनिट,
इव्हेन्ट मॅनेजमेंट, फॅशन डिझायनिंग यासारखे
व्यवसाय सुरु करण्यासाठी सक्षम केले जाते. तसेच अन्न प्रक्रिया व साठवणूक, हेल्थ क्लब, लॅन्डस्केप प्लॅनिंग, फर्निचर डिझायनिंग, निवासस्थाने, व्यावसायिक संस्था व दवाखाने, मॉल्स आदींसाठी गार्डन
डिझायनिंग, पुष्प रचना, पुष्पगुच्छ
निर्मीती, गिफ्ट पॅकेजिंग, इको टुरीझम,
बालकांसाठी शैक्षणिक साहित्य व खेळणी निर्माण हाऊस किपींग, पत्रकारिता,
व्हिडिओ ग्राफी, कंपन्यामध्ये पब्लिक रिलेशन ऑफिसर्स तथा मार्केटींग यासारख्या
अभिनव क्षेत्रातही विद्यार्थ्यांना करिअरच्या फार मोठ्या संधी आहेत.
शिक्षणाच्या
व नोकरीच्या संधी : या अभ्यासक्रमाचे पदवीधर एमबीएसाठी
पात्र असून त्यांना नॅशनल ॲकडमी ऑफ ॲग्रीकल्चरल रिसर्च मॅनेजमेंट (NAARM) संस्थेतून बिझनेस एडमिनिस्ट्रेशन पदव्युत्तर अभ्यासक्रम या व्यतिरिक्त ते
त्यांच्या आवडीच्या विषयात जसे की , स्पेशल एज्युकेटर,
स्पीच थेरपी, बाल व कौटुंबिक समुपदेशन,
इंटेरीअर डिझायनिंग, फॅशन डिझायनिंग,
स्कूल कॉउन्सलर इ. डिप्लोमा अभ्यासक्रम करुनही करिअर घडवण्याच्या
संधी आहेत.
या
अभ्यासक्रमाचे पदवीधर एमपीएससी, युपीएससी व इतर
स्पर्धा परीक्षांसाठी देखील पात्र आहेत. या महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी
विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली असून दिवसेंदिवस विद्यार्थ्यांसाठी नोकरी-व्यवसायाच्या
कक्षा रुंदावत आहेत.
स्वायत्त
व आंतरराष्ट्रीय संस्थामधील संधी : किशोर न्यायालय (JJB),
केंद्रीय समाज कल्याण मंडळ, राष्ट्रीय शैक्षणिक
संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT), राष्ट्रीय सहकार्य व
बालविकास संस्था (NIPCCD), युनिसेफ, युएनडीपी,
युएसडी, एफएओ, डब्ल्युएचओ
यासारख्या संस्थामध्येही करिअरच्या संधी आहेत. तेव्हा विद्यार्थी व पालकांनी
सामुदायिक विज्ञान अभ्यासक्रमाची करिअरच्या बाबतीत असणारी व्याप्ती लक्षात घेऊन या
अभ्यासक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा.
प्रवेश माहितीसाठी
वेबसाईट https://agri2024.mahacet.org / www.mcaer.org / www.mcaer.org
डॉ.
जया बंगाळे
सहयोगी
अधिष्ठाता व प्राचार्य
डॉ.शंकर
पुरी
विषय
प्रमुख
सामुदायिक
विज्ञान महाविद्यालय, वनामकृवी, परभणी
भ्र
क्र ७५८८०८२०५६