Wednesday, July 10, 2024

सामायीक उष्मायन केंद्रामध्ये गुळ प्रक्रिया व उसाचा रस बाटली बंद पेय प्रक्रिया सुविधा करार तत्वावर घेण्याची सुवर्ण संधी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत अन्नतंत्र महाविद्यालयात केंद्रशासनाच्या खाद्य प्रसंस्करण उद्योग मंत्रालय तर्फे प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजने अंतर्गत सामायीक उष्मायन केंद्र (Comman Incubation Centre) उभारण्यात आले आहे. या उष्मायन केंद्रातंर्गत आधुनिक गुळ प्रक्रिया, उसाचा रस प्रक्रिया व मसाले प्रक्रिया केंद्र स्थापित केले आहे. सदरील उष्मायान केंद्र हे केंद्र शासनाच्या 1 जिल्हा 1 पदार्थ या उपक्रमावर आधारीत असून यामध्ये गुळ, गुळ पावडर, गुळ वडया, काकवी निर्मिती तसेच उसाच्या रसापासून बाटली बंद पेय तयार करण्यासाठी आवश्यक यंत्र सामुग्री उपलब्ध आहे. सदरील उष्मायन केंद्राचा अन्न प्रक्रिया व मुल्यवर्धनसाठी सामायीक सुविधा केंद्र म्हणुन उपयोगात आणल्यामुळे यापासुन नवउद्योजक नाविण्यपुर्ण अन्नपदार्थ संस्करणाद्वारे निर्मिती करतील.  तसेच सदरील उष्मायन केंद्रामार्फत उपरोक्त नमूद विविध प्रक्रिया लाईनचे प्रशिक्षण शेतकरी, उत्पादक कंपन्या, महिला, स्वंय सहायाता गट तसेच नवउद्योजक इत्यादींना प्रात्यक्षिकातून प्रशिक्षण दिले जाऊन संबंधीतांना गुळ प्रक्रिया व उसाचा रस बाटली बंद पेय प्रक्रिया तसेच त्यासंबंधीचे अन्न प्रक्रिया, सुरक्षा व स्वच्छता मानके बाबत प्रशिक्षीत केले जाणार आहे. ज्यामुळे नवउद्योजकता वाढीस पाठबळ मिळणार आहे. यामध्ये उष्मायन केंद्राचा वापर करुन नवउद्योजक गुळ प्रक्रिया व उसाचा रस बाटली बंद पेय प्रक्रियेमध्ये तांत्रिकदृष्टया सक्षम होऊन सदरील पदार्थांची प्रक्रिया, पॅकेजिंग तथा अन्न तपासणी सुविधेचा उपयोग करता येईल. या उष्मायन केंदातील सुविधांचा उपयोग करुन लघु व सुक्ष्म उद्योजकांना त्यांचे अन्न पदार्थ व त्याचा ब्रँड विकसीत करणे. यातील प्रक्रिया साखळीचा उपयोग करुन विकसीत अन्न पदार्थ निर्मितीची चाचणी घेऊन त्याची व्यावसायीक तत्वावर तरलता तपासता येईल.

सदरील उष्मायन केंद्रामध्ये गुळ प्रक्रिया व उसाचा रस बाटली बंद पेय प्रक्रिया करण्यासाठी ऑपरेशन व देखभाल करार तत्वावर निविदा मागविण्यात आल्या आहेत. त्यासंबंधी अधिक माहितीसाठी http://mahaetenders.gov.in आणि www.vnmkv.ac.in या संकेतस्थळास भेट द्यावी.


सौजन्य
सहयोगी अधिष्ठाता आणि प्राचार्य
अन्नतंत्र महाविद्यालय, वनामकृवि, परभणी