Wednesday, July 31, 2024

ब्रह्मपुरी येथे कृषि कन्या तर्फे पशु लसीकरण कार्यक्रम राबविला

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणीच्या कृषि महाविद्यालयातील ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत ब्रह्मपुरी ता. जि. परभणी येथे पशूंच्या घटसर्प रोग प्रतिबंधक लसीकरणाचा कार्यक्रम पशुवैद्यक विभागाच्या मदतीने दि. ३० जुलै रोजी घेण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल व विभाग प्रमुख डॉ. राजेश कदम, प्रभारी अधिकारी डॉ. आनंद दौंडे आणि सहयोगी प्राध्यापक डॉ. महेश दडके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी  श्री बापूराव  झांबरे हे होते तर श्री. बाळासाहेब गिराम व श्री. देशमुख यांची प्रमुख उपस्थित होती.

यावेळी डॉ.रमेश पाटील यांनी शेतकऱ्यांना पशुलसीकरणाचे महत्व सांगितले व घटसर्प , फऱ्या रोगापासून आपल्या पशुंचे रक्षण कसे करावे हे सांगितले. पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. यू. आर लखारे यानी पशुंचे रोगप्रतिबंधक उपाय सांगितले. कार्यक्रमाचे  प्रास्ताविक  डॉ. दिलीप झाटे यांनी केले तर सुत्रसंचालन कृषि कन्या साक्षी नाईकवाडीने केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृषि   कन्या उर्मिला लोंढे, साक्षी लाड, प्रीती लोणकर, मनीषा मखमले, आकांक्षा मस्के, दर्शन मात्रें, धनश्री मोरे, अंबिका मुखरे, प्रीती नाईक, विद्या नाईकवाडे, ममता पांचाळ, पायल पाटणकर, गीता पवार, पूजा पिठले यांनी परिश्रम घेतले, कार्यक्रमामध्ये मोठया संख्येने ग्रामस्थ उपस्थित राहून पशुधनास लसीकरण करून घेतले.